tractor in the fild.jpeg 
विदर्भ

अरे देवा! बाजारात दर मिळत नसल्याने त्याने चक्क शेतात जनावरे सोडून फिरविला ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि.वाशीम) : तालुक्यातील शेलुबाजार येथून जवळ असलेल्या तपोवन येथील गोपाल येवले यांनी एक एकर क्षेत्रात उन्हाळी काकडीची लागवड केली. मात्र, काकडी विक्रीला आल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरू झाला. 

परिणामी, बाजारात दर मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकर्‍यांने काकडीच्या पिकात जनावरे सोडून, पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. उन्हाळी काकडी पिकासाठी गोपाल येवले यांनी 50 हजार रुपये लागवड खर्च केला होता. मात्र, हा लागवड खर्च सुद्धा वसूल झाला नाही. येवले यांना काकडीच्या पिकापासून अंदाजे दोन लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांचा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व महानगरे व शहरे ठप्प झाली आहेत. 

अशा स्थितीतही शेतकरी जगाचे पोट भरण्याकरीता शेतात राबराब राबतो आहे. तरीही शेतकर्‍याच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादीत माल विकण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांना आधार देऊन विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन, त्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT