traffic problem raised due to late parking plaza inauguration in gondia 
विदर्भ

पार्किंग प्लाझाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघेना, कोट्यवधी खर्च करूनही वाहने रस्त्यावरच

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : वाहनांच्या पार्किंगसाठी शहरातील अग्रसेन भवनाजवळ कोट्यवधी रुपये खर्चून पार्किंग प्लाझा उभारण्यात आला. याला दोन वर्ष लोटली. तरीही प्लाझाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त अद्याप निघाला नाही. त्यामुळे आजही वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. येत्या 15 दिवसांत ही समस्या निकाली न काढल्यास आम्ही पार्किंग प्लाझाचे उद्‌घाटन करू, असा इशारा एनएसयूआय, शहर कॉंग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसने दिला आहे.

शहरातील लोकसंख्येच्या मानाने चारचाकी, दुचाकी वाहनांची संख्या दुप्पट, तिप्पट आहे. प्रमुख चौकात दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीला अनेकांना सामोरे जावे लागते. बाजारपेठ परिसरात प्रत्येक 2 मिनिटांनी वाहतूक विस्कळीत होत असते. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी 15 ते 20 मिनीटांचा वेळ वाया जातो. कधीकाळी अपघातही होतात. या सर्व प्रकारावर आळा बसावा, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी येथील शहर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या अग्रसेन भवनाजवळ पार्किंग प्लाझा उभारण्यात आला. यासाठी 7 कोटी 80 लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. बांधकाम होऊन दोन वर्षे लोटली. तरीही प्लाझाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त अद्याप निघाला नाही. लालफितशाहीत उद्‌घाटन सोहळा अडकल्याचे बोलले जात आहे. व्यापारीदेखील यामुळे त्रस्त आहेत. 

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेले लॉकडाउन हळूहळू हटविण्यात आले. अनलॉक सुरू आहे. शहरातील नागरिक कामानिमित्त बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र, वाहतूक विस्कळीत झालेल्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती आहे. व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. तथापि, दोन वर्षांपासून लालफितशाहीत अडकलेल्या पार्किंग प्लाझाचे येत्या 15 दिवसात लोकार्पण करावे, अन्यथा आम्ही पार्किंग प्लाझाचे उद्‌घाटन करू, असा इशारा एनएसयूआय, शहर काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसने राबविले स्वाक्षरी अभियान -
पार्किंग प्लाझा सुरू करण्याबाबत प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन, अमर वराडे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी अभियान राबविले. यात शेकडो व्यापाऱ्यांनी पार्किंग प्लाझाच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या केल्या. या अभियानात दिनेश कोठारी, अभिषेक जैन, अहमद सय्यद, नियाज शेख सहभागी झाले होते.

मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन -
येत्या 15 दिवसांत पार्किंग प्लाझा सुरू करण्यात यावा, अन्यथा आम्ही उद्‌घाटन करू, याबाबतचे निवेदन एनएसयूआय, शहर काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसने नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांना दिले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष जहीर अहमद, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, जिल्हा एनएसयूआयचे अध्यक्ष हरीश तुळसकर, अफसर खान, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव जाहिद सोळंकी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT