crime sakal
विदर्भ

शिकाऊ डॉक्टरचा खून प्रकरण; दोन आरोपींच्या पीसीआरमध्ये वाढ

वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरच्या खून प्रकरणात अटक केलेल्या दोन आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने गुरुवारी (ता.१८) न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरच्या खून प्रकरणात अटक केलेल्या दोन आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने गुरुवारी (ता. १८) न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने पुन्हा आरोपींच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली. ऋषीकेश गुलाबराव सवळे ( वय 23 ,रा. महाविर नगर, यवतमाळ), प्रवीण संजीव गुंडजवार (वय 24 रा. सावित्रीबाई फुले सोसायटी) अशी कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

दुचाकीचा धक्का लागल्याने वाद निर्माण होऊन अशोक पाल याचा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात खून करण्यात आला होता. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी मारेकऱ्यांना अटक करण्यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन सुरू केले होते. एकूणच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरविली.

पाल याच्या खुनाचा उलगडा 48 तास उलटण्यापूर्वीच करीत दोन तरुणासह विधी संघर्ष ग्रस्तबालकाला अटक केली. 14 नोव्हेंबरला यवतमाळ शहर पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर विधिसंघर्षग्रस्त बालकाची बालसुधार गृहात रवानगी केली आहे.

दरम्यान गुरुवारी दोन आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी अधिक तपासाच्या अनुषंगाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ मागितली. त्या अनुषंगाने आरोपींना अधिक सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Food Adulteration Action : सांगलीत तुकाराम मुंडे पॅटर्नचा दणका! 41 जण गजाआड, 34 दुकाने सील; भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले

लेकीने पदक जिंकले, पुलेला गोपिचंदने मिठी मारली! त्रिशा-गायत्रीची BWF World Championships मध्ये ऐतिहासिक कामगिरी; भावनिक क्षण Video

Kolhapur Gokul Election 2026 : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'गोकुळ'चं चित्र होणार स्पष्ट; बिनविरोधची शक्यता मावळली, अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

मुन्नाभाई M.B.B.S. मधली सुमन आठवतेय? 45 व्या वर्षीही सिंगल आहे ग्रेसी सिंह, आता काय करते?

Marathi News Live Updates : दिल्लीच्या करोल बाग भागात एका जुन्या इमारतीची भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT