Transgender tried to fired out in Amravati  
विदर्भ

किन्नराचा रस्त्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; अमरावतीमधील इर्वीन चौकात आंदोलन

संतोष ताकपिरे

अमरावती ः खऱ्या किन्नरांना बनावट किन्नर म्हटल्यामुळे संतप्त झालेल्या किन्नरांनी शुक्रवारी (ता. 26) इर्वीन चौकात रास्तारोको आंदोलन छेडले. त्यांच्यातील एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचाही प्रयत्न केल्याने चांगलीच तारांबळ उडाली.

मागील काही दिवसांपासून किन्नर व काही युवकांमध्ये वाद होऊन मारहाण झाली होती. त्यात एकाने किन्नरांना बनावट म्हणून संबोधले. त्यामुळे बडनेरातील काही किन्नरांनी संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पोलिस आयुक्तालयावर आंदोलन केले होते. त्यानंतर आज (ता. 26) इर्वीन चौकात आंदोलन झाले. त्यांनी आक्षेप घेणाऱ्याविरुद्ध घोषणा दिल्या, सदर व्यक्तीला पोलिसांनी आपल्यासमोर उपस्थित करून माफी मागायला लावावी. अशी मागणी रेटून धरली. 

आंदोलन करणारे किन्नर रहदारीच्या रस्त्यावर आले, त्यांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तैनात महिला पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी सुरू असतानाच एकीने रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी त्या किन्नरास आटोक्‍यात आणले. 

आक्षेप असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ठाण्यात बोलविले. चर्चा करण्यासाठी किन्नरांचे दोन प्रतिनिधीही दाखल झाले. चर्चेदरम्यान संबंधित व्यक्तीने किन्नरांबद्दल आपल्याला आदर असल्याचे स्पष्ट केले.

आंदोलन करताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. महिला पोलिसांशी धक्काबुक्की केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
- आसाराम चोरमले, 
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT