cyber crime 
विदर्भ

चुकीच्या कस्टमर केअरवर केला कॉल अन्  ऑनलाइन व्यवहार पडला व्यापाऱ्याला महाग 

संतोष ताकपिरे

अमरावती ः गुगल-पे वरून चुकीचा कस्टमर केअर नंबर शोधून संपर्क साधल्यामुळे शहरातील एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या खात्यातून ७९ हजार ८६० रुपये तोतयाने हडपले. आनंदभूषण अरुण वानखडे (वय 30, रा. रेवसा) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

प्रत्येक क्षेत्रात ऑनलाइन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. त्यासाठी ज्या साइटचा ग्राहक वापर करतात त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर कस्टमर केअर नंबर दिलेला असतो. ग्राहकांना आर्थिक व्यवहारात काही अडचण आल्यास त्या अधिकृत नंबरवर माहिती घेता येते. परंतु गेल्या आठ महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या ऑनलाइन आर्थिक व्यवहारात बऱ्याच जणांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली. फसवणूक झालेल्यांनी संबंधित साइटच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर संपर्क न साधता चुकीच्या साइटवरील त्याच नावाशी समकक्ष नंबरवरच खरा कस्टमर केअर नंबर समजून संपर्क साधला.

त्यानंतर त्या ग्राहकांना ज्या तोतयांनी फोन केले त्यांनी गेलेले पैसे परत करण्यासाठी काही लिंक पाठविल्या. त्याच लिंक डाउनलोड केल्यानंतर ग्राहकांनी आपल्या खात्याची माहिती तोतयांना सहज उपलब्ध करून दिली. त्यामुळेच त्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली.

अवश्य वाचा - आला जावयाच्या कौतुकाचा महिना! बाजारात गर्दी, मिठान्न आणि भेटवस्तूंची रेलचेल

वानखडे या ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकानेही गुगल-पे वरून ऑनलाइन पैसे पाठविले. त्यांना पेमेंट सक्‍सेस झाले नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अशाच पद्धतीने संपर्क साधून तोतयाने पाठविलेली लिंक डाउनलोड केल्याने त्यांची फसवणूक झाली. शहर सायबर पोलिसांनी वानखडे यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

ऑनलाइन व्यवहार ही काळाची गरज असली तरी, खात्री झाल्याशिवाय अनोळखी व्यक्तीने पाठविलेली एखादी लिंक डाउनलोड करू नये. त्यातून खासगी माहिती तोतयापर्यंत सहज पोहोचत असल्याने फसवणूक होते.
- प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT