online bus.jpg 
विदर्भ

एसटीत प्रवास करता...मग हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड (जि. अकोला) :  अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था आधीच भंगार झालेली असल्यामुळे या रस्त्यांवरून वर्षानुवर्षांपासून बहुतांश बसेस सुद्धा अत्यंत भंगार अवस्थेत पोहोचल्या असून जवळपास सर्वच बसची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. यामुळे प्रवाश्यांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.


हे वाचा - रात्री प्रेयसीच्या घरात घुसला अन् जीवाने गेला
टायर झाले धोकादायक

अनेक वर्षांपासून नवीन बसेसचे आवश्यकता असताना शासनाकडून नवीन बसेस आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून न दिल्यामुळे कालमर्यादा संपलेल्या भंगार बसेसमधून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. ह्या भंगार गाड्या रस्त्यांवर कित्येकदा बंद पडत असून प्रवाशांना नाहक हेलपाटे सुद्धा सहन करावे लागतात. काही बसचे टायर रिमोल्डिंग पट्टे निघालेले असताना सुद्धा प्रवाशांच्या जिवाची पर्वा न करता त्या तसेच रस्त्यांवर चालवून भीषण अपघातांना निमंत्रण दिले जात आहे.


क्लिक करा - महावितरणने बेरोजगारांना दिला ‘रोजगाराचा अभ्यास’
नवीन एसटीची होत आहे मागणी

तेल्हारा आणि अकोट ह्या घरात भंगार बसेसची संख्या सर्वात जास्त असल्याचे कळते. तेल्हारा येथील आगारात मागील आठ वर्षांपासून बॉडी फिटर आणि वेल्डर नाहीत मुख्य मेकॅनिक आणि तज्ज्ञ यांत्रिक सुद्धा कमी आहेत. आवश्यक असलेल्या प्रमाणात साहित्य सुद्धा मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. बस भंगार होण्याचे मुख्य कारण भंगार रस्त्याचा आहेत असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने त्वरित निर्णय घेऊन भंगार एसटी बसेसच्या जागी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून समोर येत आहे.

अधिकाऱ्यांचा आहे नाईलाज
मागणीच्या प्रमाणात नवीन बस मिळत नसल्याने आणि योग्य प्रमाणात साहित्य मिळत नसल्याने आमचा नाईलाज आहे.
-नितीन महल्ले, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, तेल्हारा आगार

जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो
दैनंदिन प्रवासी असून अनेक वर्षांपासून भंगार बसमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
-महेंद्र राऊत, प्रवासी, हिवरखेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात खळबळ ! ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा आरोप

Talathi Office Bribery : वडिलांचे नाव लावायला उपसरपंच, तलाठ्याने गाठली खालची पातळी, ‘लाचलुचपत’ पथक आलं शेतकऱ्याच्या मदतीला

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन लोकार्पणाच्या प्रतीक्षेत; रुग्णांना आर्थिक फटका

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Sangli Property Card : सदनिकाधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारकडून हालचाली, कायद्याच्या अभ्यासासाठी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT