A truck carrying fish overturned in Wardha 
विदर्भ

ही तर देवाचीच कृपा! चक्क रस्त्यावर पडला मासोळींचा सडा; नागरिकांसाठी दिवस ठरला मेजवाणीचा

दीपक चौधरी

तळेगाव (श्‍या.पं.) (जि. वर्धा) : नागपूर-मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर ट्रकचे नियंत्रण बिघडल्याने मासोळी नेणारा ट्रक उलटला. ही घटना शनिवारी (ता. पाच) पहाटेच्या सुमारास घडली. रस्त्यांवर मासोळ्यांचा सडा पडल्याने हा अपघात परिसरातील नागरिकांसह मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांसाठी मेजवाणीचा ठरला.

मालवाहू ट्रक क्रमांक डब्लूबी २५, के ३०६४ हा मासोळी घेऊन कोलकता येथून मुंबईकडे जात होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रक सत्याग्रही घाटातील वळणावर उलटला. ट्रक उलटताच रस्त्यावर मासोळ्यांचा खच पडला. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी रस्त्यावर पडून असलेल्या मासोळ्या थैलित भरून आपापल्या घरी नेल्या. यामुळे या भागातील घरोघरी मासोळीचेच पदार्थ शिजल्याची चर्चा होती.

या अपघातात ट्रक चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले. ट्रक रस्त्यावर आडवा पडल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच तळेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुधीर डांगे, राजू शाहू, गजानन बावणे, अमोल इंगोले, अनिल ढाकणे, नीतेश वाधमारे, रूपेश उगेमुगे, विजय उईके, आशीष नेवारे, रोशन कैलुके, बालाजी मस्के आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहायाने ट्रकला रस्त्याच्या कडेला घेऊन रहदारी सुरळीत केली. सदर घटनेची नोंद तळेगाव पोलिसात करण्यात आली असून तपास सुरू आहे.

शनिवारमुळे अनेकांच्या आनंदावर विरजण

मासोळींचा ट्रक उलटल्याने हा अपघात या भागातील खवय्यांसाठी मेजवाणी ठरला. काहींनी रस्त्यावर सापडलेल्या मासोळ्या घरी नेत त्यांच्यावर ताव मारला. तर दिवस पाळणाऱ्यांची शनिवारमुळे पंचाईत झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठवाडा भूकंपाने हादरला; नांदेड, परभणीसह हिंगोलीला भूकंपाचे धक्के

LPG EKYC: घरबसल्या मोबाइलवरच करा ई-केवायसी; आता गॅस एजन्सीवर जाण्याची अजिबात गरज नाही, कशी करावी ई-केवायसी?

Artemis 2 Splashdown Video: चंद्रावरील एक ऐतिहासिक प्रवास पूर्ण NASA चे वीर परतले, चंद्रावरुन पृथ्वीवर उतरण्याचा अद्भुत व्हिडिओ

IPL 2026: धडाकेबाज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आज कोण मारणार बाजी; कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : परभणी, नांदेड हिंगोलीला भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT