Twelfth student dies of leukemia
Twelfth student dies of leukemia  
विदर्भ

असह्य वेदनांची अखेर; संजीवनीची कर्करोगाशी झुंज अपशयी, तरीही बारावीत मिळविले तब्बल एवढे टक्‍के... 

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : "ती' चार वर्षांपासून रक्‍ताच्या कर्करोगाशी लढत होती. एकीकडे कर्करोगाशी तिचा दररोजचा संघर्ष तीव्र होत होता, तर दुसरीकडे बारावीची परीक्षा जवळ येत असल्याने अभ्यासाकडेही तिचा ओढा होता. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संजीवनीला डॉक्‍टर व्हायचे होते. परंतु, नियतीने काही वेगळेच ठरवले होते. बारावीची परीक्षा तर तिने दिले. घवघवीत यशही तिने मिळविले. परंतु या यशाचा आनंद क्षणिक ठरला. बारावी तर ती जिंकली, परंतु तिची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी (ता. 24) संजीवनी उसेरटी हिचे निधन झाले. एवढ्या मोठ्या आजाराशी लढा देत असताना बारावीत तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. परंतु हे कौतुक ऐकण्यासाठी आज ती नाही. 

संजीवनीला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि उसेरटी कुटुंबीय हादरले. तेव्हा ती दहाव्या वर्गात होती. मात्र, संजीवनीने हिंमत हारली नाही. उपचार घेतच दहावती तिने तब्बल 75 टक्के गुण मिळविले. त्यानंतर सुरू झाला तो मानसिक आणि शरीरावर आघात करणाऱ्या कर्करोगाशी लढा. संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयात दाखल झाली. मृत्यूशी दोन हात करत तिने बारावी गाठले. मात्र ती वर्गात अभावानेच बसली. तिचे पूर्ण शिक्षण एका अर्थाने ऑनलाईन झाले. वेळच तशी होती. 

संजीवनीला सातत्याने केमोथेरपीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. याशिवाय सतत रक्तदेखील द्यावे लागत होते. उपचारादरम्यान जमेल तसा वेळ अभ्यासासाठी काढला. नियतीला शरण न जाता आलेल्या परिस्थितीशी दोन हात केले. बारावीच्या परीक्षेतही 75 टक्के गुण मिळविले आणि निराशा झालेल्या, उमेद खचलेल्या तरुणाईसमोर नवी प्रेरणा निर्माण केली. वेदना देणाऱ्या या आजारात कुटुंबीयांची तिला भरभरून साथ मिळाली. कुटुंबीय आणि आत्मबळाच्या भरोशावर बारावीत तिने हे यश मिळविले. तिला डॉक्‍टर व्हायचे होते. मात्र तिचे स्वप्न आता कायमचे मिटले. नागपुरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारला तिची प्रकृती ढासळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आणि असह्य वेदनांची अखेर झाली. 
 

तरुणाईसाठी प्रेरणादायी 

सध्या छोट्या-मोठ्या कारणावरून जीवनाप्रती निराश होण्याच्या घटना आपल्या भवताली घडताना दिसतात. अल्पशा यशाचे खचून आत्मघाताचा निर्णय घेण्याचे प्रमाण तरुणाईत अधिक आहे. मात्र संजीवनीने मोठ्या हिमतीने आयुष्यासोबत लढली. परीक्षेच्या काळातही तिला कर्करोगावरील उपचारासाठी केमोथेरपी घ्यावी लागत होती. सतत रक्त बदलावे लागत असल्याने गेले वर्षभर संजीवनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरी अखेरपर्यंत ती हिंमत हारली नाही. तिची हीच हिंमत तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. 
 

तिला डॉक्‍टर व्हायचे होते 


सततच्या उपचारांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. तरीही परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करत संजीवनीने बारावीच्या निकालात घवघवीत यश मिळविले. अत्यंत वेदना देणारा आजार मात्र कुटुंबाची भरभरून मिळालेली साथ या जोरावर तिने बारावीचे रण जिंकले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने डॉक्‍टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. 

संपादित : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

SCROLL FOR NEXT