Two brother lost their lives to save the crop 
विदर्भ

रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी केला जालीम उपाय, पण घडले हे अघटित...

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : अल्पभूधारक शेतकऱ्याचे संयुक्त कुटुंब. शेतात मोठ्या मेहनतीने उसाची लागवड केली. परंतु, उसाच्या फडात रानडुकरे शिरून नासधूस करतात. उसाचा फडशा पाडतात. म्हणून त्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी दोन्ही चुलत भाऊ गेले. परंतु, नियतीने त्यांनाच आपले सावज बनविले.

रानडुकरांपासून उसाच्या संरक्षणासाठी झाडावर बसून अर्थिंग तार लांबविताना विजेच्या मुख्य तारेला स्पर्श झाला. यात दुलीचंद यादवराव गौपाले (वय 35) व मुकेश माधवराव गौपाले(वय 25) रा. लोभी (ता. तुमसर) या दोन्ही चुलत भावंडांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. 24) सकाळी चांदमारा शेतशिवारात ही दुर्दैवी घटना घडली.

लोभी येथील यादवराव गंगारा गौपाले व त्यांच्या भावाची चांदमारा येथे एक-दीड एकर शेती आहे. शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय असून, मुलगा दुलीचंद हासुद्धा शेतीत वडिलांना हातभार लावायचा. सध्या शेतात उसाचे पीक लावले आहे. परंतु, दररोज रानडुकरे येऊन उसाचे नुकसान करतात. त्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त आहेत.

चुलत भाऊ असलेले दुलीचंद व मुकेश दोघेही शेतावर गेले. शेताच्या सभोवताल तार लांबवीत होते. अचानक हातातील तारेचा वीज वाहून नेणाऱ्या जिवंत तारेला स्पर्श झाला. अन एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला वनविभाग व प्रशासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

दोष कोणाचा?


शेतकरी व त्याची शेती ही कायम असुरक्षित. कधी कोरड्या दुष्काळाचे भय तर कधी अवकाळाची भीती. सर्पदंशाने तर कधी वीज पडून शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अकाली मृत्यू येण्याच्या घटना घडतात. शेती हा जीव की प्राण. घाम, गाळून कष्ट करून पिकविलेले उभे पिक डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून सैरभैर झालेल्या, संतापलेल्या शेतकऱ्याला मग टोकाची भूमिका घ्यावी लागते. बरेच शेतकरी रानडुकरांना उसापासून दूर ठेवण्यासाठी तारांचे कुंपण करून वीजप्रवाह सोडतात. वनविभाग, प्रशासन व पोलिस या सर्वांच्या लेखी तो गुन्हा असला तरी तो शेतकऱ्यांसाठी अखेरचा उपाय असतो. यात दोष कोणाचा? हा प्रश्‍न कधीच न सुटणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT