two dead due to sari syndrome in yavatmal 
विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात "सारी' आजाराने घेतले दोन बळी, ही आहेत लक्षणे

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. याच भयभीत वातावरणात आता कोरोनोसोबत सारी आजाराचीही एन्ट्री झाली आहे.  यामुळे आठवडाभरात दोघांचा बळी गेला असून, 12 रुग्ण आढळून आले आहेत. दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असल्याने नागरिकांनी आणखी सावधान होणे गरजेचे झाले आहे.

सारी (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) या आजाराने कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवरच आपले डोके वर काढले आहे. सारीच्या रुग्ण श्‍वास घेताना धापा टाकतो. या आजाराची मुख्य लक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्हायरल आणि बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन हे सारीचे मूळ आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या आजाराची सुरुवात होताना लक्षणावरून आजाराची कल्पना करता येऊ शकते. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सारी आजाराकडे लोकांसह आरोग्य यंत्रणेचे विशेष लक्ष आहे.

महागाव तालुक्‍यातील करंजखेड येथील 56 वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी (ता.10) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 11) मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला होता. ताप, खोकला, उलटी, श्‍वास घेण्यास त्रास ही लक्षणे आढळून आल्याने अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. रविवारी (ता. 12) यवतमाळ येथील गणेशनगरातील 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांना खोकला व श्‍वसनाचा त्रास होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नमूने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. मात्र, दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. या दोन्ही व्यक्तींच्या आजाराची लक्षणे ही सारीची होती तर, आतापर्यंत 12 जणांवर उपचार करण्यात आले आहेत.

असा ओळखा आजार

वयोवृद्ध व्यक्ती, बालक, रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांना सारीची लवकर लागण होते. श्‍वास घ्यायला खूप त्रास होतो. सर्दी, ताप, खोकला होतो. फुफ्फुसात सूज येऊन रुग्ण कमी कालावधीत गंभीर आजारी पडतो. यामुळे घाबरून न जाता, तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

कोरोना विषाणूचा संसर्ग असणाऱ्या रुग्णांवर वैद्यकीय महाविद्यालयातील आयशोलेशन वॉर्डात काळजीपूर्वक उपचार करण्यात येत आहेत. काही रुग्ण सारी आजाराची लक्षणे असणारेही येत आहेत. दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने त्यांचेही रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सर्दी, ताप, खोकला, ही प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे कुणीही अंगावर दुखणे काढू नये, तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावे.
- डॉ. मिलिंद कांबळे, कोरोना समन्वयक, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT