Two die due to Corona in Amravati 
विदर्भ

अमरावतीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

संतोष शेंडे

अमरावती : कोरोनाबाधितांचा आकडा जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता तीस झाली आहे. बेस्ट इस्पितळात दाखल दोन कोरोनाबाधित व्यक्तींचे काल निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील हबिबनगर येथील 53 वर्षीय पुरुषाचे काल निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल तीन तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बेस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले.

बेस्ट इस्पितळात दाखल असलेल्या एका 60 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. ही व्यक्ती गौसनगर येथील रहिवासी होती. ते सारी आजाराचे रुग्ण होते. सात जुलै रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता व बेस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दोघांच्या मृत्युमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या आता तीसवर पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 780 असून, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या सध्या 220 आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात 207 तर नागपूर येथे 13 रुग्ण दाखल आहेत. उपचारानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 531 आहे.

दोन दिवस जनता कर्फ्यू

शुक्रवारी सायंकाळपासून अमरावतीत दोन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात घोषणा केली आहे. या काळात भाजीपाला, किराणा तसेच फळ बाजारसुद्धा बंद राहणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT