amravati accident
amravati accident e sakal
विदर्भ

अंजनगाव-परतवाडा मार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : अंजनगाव-परतवाडा महामार्गावर (anjangaon paratwada highway) बुधवारी (ता. आठ) झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या व्यक्तीचा उपचारासाठी अमरावती (amravati) येथे नेत असताना रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाच्या स्मशानभूमीजवळील वळणावर गेल्या 15 दिवासांत झालेला हा दुसरा भीषण अपघात आहे.

अंजनगावसूर्जी येथील मेडिकल दुकान चालक, पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते, उत्कृष्ट निवेदक व वक्ता प्रमोद निपाणे हे कार्यक्रमाकरिता स्वतःच्या कारने (एमएच 27 बीव्ही 2012) अचलपूर येथे जात होते. त्यांच्यासोबत येथील अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण यासुद्धा जात होत्या. अंदाजे 12 वाजेदरम्यान पांढरी येथील वळणावर परतवाडा येथून अंजनगावसुर्जीकडे येत असलेल्या ट्रकने (क्रमांक ः जीबी 2602) समोरासमोर दिलेल्या धडकेने कारला जवळपास पन्नास फूट फरफटत नेल्याने कारमध्ये बसलेल्या चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रमोद निपाणे यांना पांढरी येथील नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने गाडीतून बाहेर काढत अंजनगावसुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा पांढरीसह संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. अंजनगावसुर्जी येथील पोलिस प्रशासनाने महामार्गाच्या क्रेनने ट्रकमध्ये फसलेले वाहन काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेला हा दुसरा अपघात आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. महामार्ग बांधत असताना अपघातासाठी कारण ठरणारे वळण प्रशासनाने काढू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नसून महामार्ग प्रशासन आणखी किती अपघाताची वाट पाहत आहे? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : 'अब 400 पार'ला लागले ग्रहण! अजूनही भाजप बहुमतापासून दूर, इंडियाकडे काय आहे कल?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर

Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT