two farmers commit to suicide in teosa of amravati 
विदर्भ

अख्खं गाव हळहळले! दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, फुटला अश्रूंचा बांध

प्रशिक मकेश्वर

तिवसा(अमरावती) : तालुक्‍यातील दापोरी खुर्द येथील दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शेतमजुराने १५ जानेवारीला विष घेतले होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाला, तर शेतकऱ्याने रविवारी (ता.१७) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एकाचवेळी गावातील दोघांनी जीवनयात्रा संपविल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

शेतमजूर दिनेश रूपराव उईके (वय ४०), तर शेतकरी सारंगधर महादेव वावरे (वय ५२), असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. वाढती महागाई व हाताला काम नसल्याने आर्थिक डबघाईस आलेल्या दिनेश उईके यांनी गावातीलच रस्त्यावर कीटकनाशक प्राशन केले. गंभीर स्थितीत असलेले उईके हे त्यांचे चुलत भाऊ यांना दिसताच त्यांना अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रविवारी (ता. १७) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. 

दुसरी घटना रविवारी (ता. १७) उघडकीस आली. पहाटे शेतात जाणाऱ्या व्यक्तीला शेतातील झोपडीमध्ये शेतकरी सारंगधर वावरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दोघांवरही गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक वावरे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा व मोठा परिवार आहे. मृतक वावरे यांच्याकडे तीन एकर शेती असून यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे वावरे कुटुंब मोठ्या अडचणीत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली. तर उईके यांनी हाताला काम नसल्याने व आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT