नागपूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे गुरुवारी संदीप दादाराव कुरळकर (वय ३६) या विवाहित शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. संदीप यांच्याकडे दोन एकर शेती आहे. कुरळकर यांच्याकडे दोन एकर शेती असून यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली.
दुसरी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील शेतकरी शंकर वारलू बोरकुटे यांनी शेतात विष प्राशन करून गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. शंकर यांच्या वडिलांच्या नावावर सहा एकर शेती आहे. वडिलांच्या नावे बॅंकेचे कर्ज आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.
शिंदोला (जि. यवतमाळ) : शेतात गडी म्हणून काम करणारा सुमित गजानन पुनवटकर (वय २२, रा. वेळाबाई) या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. गजानन पुनवटकर याला दोन मुले असून, पाच एकर शेतीवर उधारनिर्वाह करून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. सुमितचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सालगडी म्हणून शेतकऱ्याकडे काम करीत होता. रात्री दहा वाजता तो घरून निघून गेला. योगिराज डवरे यांच्या शेतात येऊन त्याने विष प्राशन केले. नातेवाइकांनी सुमितचा शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.
वरठी (जि. भंडारा) : भंडारा-तुमसर महामार्गावर मोहगाव टोली परिसरात एका विना क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने चार चाकीला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर एक मुलगा जखमी झाला आहे. मृताचे नाव तुषार देवराव येरपुडे (रा. सूर्यनगर, नागपूर) आहे. मोहगाव टोली परिसरात एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कारला धडक दिली. या अपघातात कारचालक तुषार येरपुडे (रा. सूर्यनगर नागपूर) गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.