Two farmers committed suicide at Amravati 
विदर्भ

कर्ज काढून दोन एकरांमध्ये सोयाबीन तर दोन एकरात पेरली होती पऱ्हाटी; मात्र, घरी येताच संपवली जीवनयात्रा

प्रतीक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीमुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. अतिरिक्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली. यामुळे हताश झालेले शेतकरी देवराव शामराव सांभारे (वय ५६, रा. ममदापूर) यांनी आत्महत्येचा पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. शेतातून घरी येताच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तिवसा तालुक्‍यातील ममदापूर गावात घडली.

प्राप्त माहितीनुसार, सांभारे यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांनी कर्ज काढून दोन एकरांमध्ये सोयाबीन तर दोन एकरात पऱ्हाटी पेरली होती. मात्र, सततच्या पावसामुळे सोयाबीनही गेले व जास्त पाऊस झाल्याने पऱ्हाटीवर बोंडआळीचा प्रादुर्भाव असल्याने तेही पीक हातून गेले. सकाळी ममदापूर शेतशिवारात असलेल्या शेतात गेले असता कपाशी पिकावर आलेली बोंडअळी व पूर्वीच सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान त्यातच शेतीसाठी कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यावर त्याचा मनावर विपरित परिणाम झाला.

शेतातून घरी येताच त्यांनी गळफास घेतला. ही बाब कुटुंबातील लोकांचे लक्षात येताच त्यांनी गळफास सोडला व तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिवसा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

अंजनगावसुर्जीत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

अंजनगावसुर्जीच्या जोड हनुमाननगर येथील युवा शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अंकित निळकंठ ढोरे (वय २२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अंकितने विष घेतल्यानंतर उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अंकितच्या शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाला. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : महिला IPS प्रकरणात रोहित पवारांनी अजितदादांची बाजू घेतली की टोमणा मारला? नेमकं काय म्हणाले?

Korean Kimchi: आंबट तिखट अन् खमंग चवीचं कोबीचं लोणचं म्हणजेच कोरियन किमची नक्की आहे तरी काय?

कुत्र्यामुळे मोडला संसार! बॉलिवूड अभिनेत्याच्या लग्न मोडण्याचं कारण ठरला कुत्रा, नक्की काय झालेलं...

Nashik News : मविप्र विद्यापीठाबाबत गैरसमज कशासाठी? संस्थेचे थेट स्पष्टीकरण!

Shivraj Bangar On Laxman Hake: 'ज्या गावच्या बोरी त्याचं गावच्या बाभळी असतात' | Sakal News

SCROLL FOR NEXT