प्रेताला अग्नी देताना sakal
विदर्भ

मुलींनी आईच्या प्रेताला दिला मुखाग्नी, मुलगा नाही म्हणणाऱ्यांना केलं गप्प

अभय भुते

जेवनाळा (जि. भंडारा) : रूढी-परंपरांना मूठमाती देत दोन्ही मुलींनी जन्मदात्या आईच्या प्रेताला खांदा दिला. एवढेच नाहीतर मुलींनीच मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले आणि आपल्या आईची इच्छा पूर्ण केली आहे. तसेच मुलगा नाही म्हणणाऱ्या लोकांना त्यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनीजवळील पोहरा येथील रहिवासी रेखा सीताराम गिर्हेपुंजे (वय 53) या माऊलीचे वृद्धापकाळाने २२ ऑक्टोबरला रात्री निधन झाले. त्यात रेखाबाई यांना मुलगा नसल्याने खांदा कोण देणार, मुखाग्नी कोण देणार अशी चर्चा सुरू झाली. असं असताना लहान मुलगी मुखाग्नी देण्यासाठी पुढे आली. दोन्ही मुलींनी खांदा देण्याचे ठरविले. रेखाबाई यांच्या दोन मुली भावना आणि निशा, तसेच भाचे राहुल गिर्हेपुंजे, रमेश गिर्हेपुंजे यांनी खांदा दिला. अंत्ययात्रा निघताना पाणी, ताट घेऊन निशा मस्के अंत्ययात्रेसोबत स्मशानाकडे गेली. त्याठिकाणी गावातील मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर रेखाबाई यांच्या प्रेतास अग्नी दिला. या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या बहिणींनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे.

मुलांपेक्षा मुली कमी नाहीत -

मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजणार? मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो, असे अनेक गैरसमज ग्रामीण भागात आहेत. याला छेद देत या दोन्ही मुलींनी आईचे अंत्यसंस्कार केला आहे. परंपरेची बंधन झुगारून धाडस दाखवणाऱ्या या बहिणीचे कौतुक होत आहे. तसेच मुलापेक्षा मुलगी देखील काही कमी नाही हे दाखवून देत सर्व जबाबदाऱ्या मुलींनी पार पाडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT