Two government science institutes in Vidarbha will get autonomy 
विदर्भ

विदर्भातील दोन शासकीय विज्ञान संस्थांना मिळणार स्वायत्तता; युजीसीकडे शिफारस

मंगेश गोमासे

नागपूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर आणि अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या शासकीय विज्ञान संस्थांच्या स्वायत्ततेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमरावती येथील शासकीय विज्ञान संस्थेच्या पाहणीसाठी १२ आणि १३ तारखेला समिती येणार आहे. नागपुरातील संस्थेला पुढल्या महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाची चमू भेट देणार आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या शासकीय विज्ञान संस्थेची स्थापना १९०६ साली करण्यात आली. राज्यातील सर्वांत जुनी विज्ञान संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे. संस्थेतून आजपर्यंत बऱ्याच नामवंत व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. अनेक वर्षांपासून संस्थेला स्वायत्तता मिळावी ही मागणी समोर येत होती. विशेष म्हणजे, त्यासाठी विद्यापीठाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पदभरती होत नसल्याने नॅकचे मूल्यांकन आणि इतर अडचणींमुळे हा विषय मागे पडला होता.

मात्र, २०१७ साली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील अधिकाअधिक संस्थांना स्‍वायत्तता मिळावी, यासाठी अटी शिथिल केल्यात. त्यातूनच गेल्या दोन वर्षात बऱ्याच संस्थांना स्वायत्तता मिळाली. यामध्ये विद्यापीठातील तीन संस्थांचा समावेश आहे. यातूनच नागपूर आणि अमरावती येथील विज्ञान संस्थांनी मागील वर्षी स्वायत्ततेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज केला.

त्यानुसार अमरावतीमधील विज्ञान संस्थेला १२ आणि १३ जानेवारीदरम्यान अनुदान आयोगाची समिती भेट देणार आहे. मात्र, नागपूरच्या विज्ञान संस्थेला नियोजित ८ आणि ९ जानेवारीऐवजी आता १२ आणि १३ फेब्रुवारीला समिती भेट देणार आहे.

केवळ शैक्षणिक स्वायत्तता मिळणार

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन प्रकारची स्वायत्तता प्रदान करण्यात येते. यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्ततेचा समावेश करण्यात येतो. मात्र, केवळ खासगी संस्था या दोन्ही स्वायत्तता स्वीकारत असतात. मात्र, नागपूर आणि अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विज्ञान संस्था शासकीय असल्याने त्यांना केवळ शैक्षणिक स्वायत्तता मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांना आपले अभ्यासक्रम, अभ्यासमंडळ आणि परीक्षा पद्धती तयार करता येणार आहे.

समितीच्या अध्यक्षांना कोरोना
मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात संस्थेने स्वायत्ततेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार ८ आणि ९ जानेवारीला अनुदान आयोगाची समिती भेट देणार होती. मात्र, समितीच्या अध्यक्षांना कोरोना झाल्यामुळे आता समिती पुढल्या महिन्यात १२ आणि १३ फेब्रुवारीला येणार आहे.
- डॉ. आर. जी. आत्राम, 
संचालक, शासकीय विज्ञान संस्था, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT