Two men are no more in accident in Bhandara district  
विदर्भ

भरधाव ट्रकनं दिली दुचाकीला धडक; भंडारा जिल्ह्यातील दोन युवक जागीच ठार

दीपक फुलबांधे

लाखांदूर (जि. भंडारा) : अर्जुनी/मोरगाव तालुक्‍यातून दुचाकीने लाखांदूर तालुक्‍यातील गावात येताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. 

ही घटना आज, शनिवारी सकाळी पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ घडली. ऋषी गोविंदा खोब्रागडे (वय ४२) आणि राजेंद्र मनिराम शेंडे (वय ३६) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी सकाळी ऋषी खोब्रागडे आणि राजेंद्र शेंडे हे दोघे अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातून एमएच ३५ / क्‍यू ७९२५ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने लाखांदूर तालुक्‍यातील पिंपळगाव (कोहळी) येथे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या सीजी ०८/ एल २१५५ क्रमांकाच्या ट्रकने पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात एवढा जोरदार होता की, या धडकेत दुचाकीवरील ऋषी खोब्रागडे आणि राजेंद्र शेंडे हे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

अपघातानंतर या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना व लाखांदूर पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार मनोहर कोरेटी, पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक तामेश्वर चमाराय साहू (वय २१, रा. राजनांदगाव) याला अटक केली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील वास्तव धक्कादायक! स्मार्ट टॉयलेटला प्राधान्य, पण कष्टकऱ्यांसाठी रात्र-निवाऱ्याचा अद्यापही अभाव

Dilip Walse Patil: मंचरमध्ये शांताबाई शेळके स्मारक उभारणार; ऐतिहासिक वाडा कोसळल्यानंतर आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Nasha Mukt Yuva For Viksit Bharat : ड्रग्सविरोधात देशव्यापी अभियान; पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन, म्हणाले- व्यसन स्वप्न उद्ध्वस्त करते

Dombivli: डोंबिवलीकरांसाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय, रो-रो सेवा सुरू करणार, कधीपासून? महत्त्वाची माहिती समोर

Abhijit Dipkeच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह? RTI कार्यकर्त्याची तक्रार, दीपकेंचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT