drowning 
विदर्भ

त्यांचा काळ आला होता आणि वेळही आली होती,पोलिस कारवाई टाळण्यासाठी नदीतून गेले अन् ...

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण घराच्या ओढीने नदीमार्गे जाण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रयत्नात दोघा प्राध्यापकांना जीव गमवावा लागला.
जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने नदीतून गावाकडे जात असताना दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १३) सकाळच्या सुमारास तालुक्यातील खरकाडा पिपळगाव) येथील वैनगंगा नदीपात्रात घडली. प्रा. पद्मनाथ तानबाजी मडावी (वय ४१) आणि संजय उके (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलिस चौक्या उभारण्यात आल्या असून, सर्वप्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेकजण पोलिस कारवाई टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी पात्रातून प्रवास करीत आहेत. तालुक्यातील निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले पद्मनाथ मडावी हे ब्रह्मपुरी येथे किरायाने राहतात. तर, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील चोप कोरेगाव येथे पत्नी आणि मुले राहतात. लॉकडाउन काळात ते नदीमार्गेच पत्नी-मुलांना भेटण्यासाठी जात होते.

सविस्तर वाचा - नागपुरात तीन गर्भवती  महिलांना कोरोनाने ग्रासले
सध्या कोविड-१९ च्या सर्वेक्षणासाठी प्रा. मडावी यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रा. मडावी हे कुरूड येथील संजय उके या मित्रासह ब्रह्मपुरीकडे येण्यासाठी निघाले. मात्र, जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने दोघांना ब्रह्मपुरीला येणे शक्य नव्हते. पोलिस कारवाई टाळण्याच्या उद्देशातून कोंडाळा ते खरकाडा नदीमार्गे नावेने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नदीतून नावेने ते खरकाडा येथे पोहोचले. त्यानंतर या दोघांनाही नदी पात्रात आंघोळ करण्याचा मोह  आवरता आला नाही. खोल पाण्यात गेल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ब्रह्मपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

SCROLL FOR NEXT