Two youths killed in unidentified vehicle collision wardha accident news 
विदर्भ

भाचीचा वाढदिवस त्यांच्यासाठी ठरला अखेरचा; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

राहुल खोब्रागडे

पवनार (जि. वर्धा) : भाचीचा वाढदिवस करून परत येत असलेल्या युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना वर्धा-अमरावती रोडवर बोरगाव (धांदे) शिवारात मंगरूळ दस्तगीर जवळ शुक्रवारी (ता. २५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. रूपेश बंडू तिघरे (वय २९) व अक्षय श्रावण बोरकर (वय २३) दोघेही रा. पवनार, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे पवनार येथे शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश तिघरे व अक्षय बोरकर हे दोघेही एमएच ३२ यू ९५७२ क्रमांकाच्या दुचाकीने रूपेशच्या भाचीच्या वाढदिवसाला गेले होते. कार्यक्रम आटपून घरी येत असताना अमरावती मार्गावर बोरगाव (धांदे) शिवारात मंगरूळ दस्तगीर जवळ अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत दोघांच्याही डोक्‍याला जबर मार बसला.

यात अक्षय बोरकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रूपेश तिघरे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रूपेश हा पानटपरी चालवीत होता. त्याला सहा महिन्याचा मुलगा आहे. तर अक्षय हा पेंटिंगचे काम करीत होता.

हे दोघेही कुटुंबातील एकुलते एक व कमवते होते. कमवत्या मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने पवनारात शोककळा पसरली आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनास्थळावरून वाहन पसार

रूपेश आणि अक्षयच्या वाहनाला भीषण धडक देणारे अज्ञात वाहन धडक देताच घटनास्थळावरून पसार झाले. या धडकेत दोघांच्याही डोक्‍याला गंभीर इजा झाली. दोघेही बराचकाळ अपघात स्थळीच पडून राहिले. या धडकेत अक्षयचा जागीच मृत्यू झाला. मात्र, रूपेश खूप वेळ घटनास्थळी पडून राहिला. त्याला वेळीच मदत मिळाली नसल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पवनार येथे शोककळा

मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना कळताच दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. गावातील दोन्ही युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरलेली आहे. या घटनेने संपूर्ण गावात स्मशानशांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT