Uddhav Thackeray Poharadevi 
विदर्भ

Uddhav Thackeray Poharadevi : 200 रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री कुणी केला, उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांवर निशाणा

Sandip Kapde

Uddhav Thackeray Poharadevi:  उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीत सभा घेतली. त्यांनी शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. तसेच पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, आजची सभा पाहून आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. महाराष्ट्रात गद्दार आणि लाचारांच सरकार चालले आहे. राजकारणाची पातळी घसरत आहे. यांच्यामुळे गद्दारांचा आणि लाचारांचा महाराष्ट्र होतोय हे कधीही दोऊ देऊ नको, अशी प्रार्थना मी पोहरादेवीला केली.

दोनशे रुपये हफ्ता घेणाऱ्याला तुम्ही मंत्री का केला. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत. आपला अजून भाजप पक्ष झाला नाही. भाजपचा आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर होते यांनी मेहनत करुन भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे.

बाळासाहेब ठाकरे लोकांच्या मनात आहेत. त्यांना कोणीही काढू शकत नाही. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत. राज्यात आता फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. आधी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून सरकार जन्माला येत.

भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या,  सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा प्रश्ना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मोदी म्हणाले राष्ट्रवादी भ्रष्ट आता तेच नेत्यांसोबत मोदींचा फोटो आहे. आमदार, खासदार गेलेत तरी दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. एक देश एक पक्ष आम्हाला चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT