Umed organization learns and cultivates agriculture 
विदर्भ

यशोगाथा :  शिकता शिकता फुलवली शेती, सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी

नरेंद्र चोरे

नागपूर  : बालपण हे तसं खेळण्याबागडण्याचं वय. या वयात मुलांना मस्ती करायला खूप आवडते. मात्र रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प संस्थेची निराधार मुले याला अपवाद ठरली आहेत. येथील चिमुकल्यांनी खेळ व शिक्षणासोबतच शेतीतही काबाडकष्ट करत भाजीपाला व फळबागही फुलवून संस्थेला आर्थिक हातभार लावला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मंगेशी मून यांनी चार वर्षांपूर्वी स्थापन केलेली उमेद संकल्प ही संस्था चोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पारधी मुलांच्या उत्थानासाठी कार्य करते. संस्थेत सध्या राज्यभरातील ४ ते १४ वयोगटातील ७० गोरगरीब मुले-मुली असून, संस्थेतर्फे त्यांचे शिक्षण व संगोपन केले जाते. या संस्थेची एकूण अकरा एकर शेती आहे. 

नऊ एकरात गहू व चणा असून उरलेल्या शेतात शेंगा, टोमॅटो, मिरची, पालक, मुळा व मेथीपासून फळे व फुलांपर्यंत दैनंदिन आयुष्यासाठी लागणारी जवळपास सर्वच पिके घेतली जातात. येथील गडी माणसाच्या मार्गदर्शनात मुलेच शेती सांभाळतात. रोप तयार करणे, पेरणी, निंदन व खुरपणीपासून भाजीपाला तोडण्यापर्यंत सर्व कामे ते मोठ्या उत्साहात करीत असतात. 

शिवाय सकाळ- संध्याकाळ राबून नवनवीन प्रयोग करीत असतात. येथील भाजीपाला ऑरगॅनिक असल्यामुळे चांगली मागणी आहे. परिसरातील अनेक ओळखीचे लोक आवडीने भाजी विकत घेतात. तसेच जास्तीचा भाजीपाला जवळच्या बाजारात विकायला नेतात. त्यातून थोडीफार कमाई होऊन संस्थेलाही आर्थिक हातभार लागतो आहे.

मुलांनी विकसित केलेल्या या उपक्रमाला नुकतीच सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ डॉ. कांचन तायडे, डाॅ. प्रेरणा धुमाळ व कृषी समन्वयक सीमा पाटील यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. शिवाय कमी वेळेत लागवड कशी करायची, याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचवेळी मशरूम ट्रेनिंगसाठीदेखील कृषी विज्ञान केंद्रात आमंत्रित केल्याचे मंगेशी यांनी सांगितले. 

त्यांच्या मार्गदर्शनामुळे दिवसभराचे काम अवघ्या काही मिनिटांत होऊ लागले. संस्थेची लवकरच नर्सरीही सुरू होत आहे. येथील मुले वर्धा येथील मानस मंदिर व कन्या शाळेत शिकतात. उल्लेखनीय म्हणजे, शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीही फुलविली आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने त्यांचा अधिकाधिक वेळ शेतात जात आहे.


मुलांना शेतीबद्दल आवड
मुळात आमच्या संस्थेतील मुलांना शेतीबद्दल खूप आवड आहे. त्यामुळेच मी त्यांना प्रोत्साहन देत गेले. त्यांनी अत्यंत मेहनतीने शेती विकसित केली आहे. या निमित्ताने संस्थेला चार-दोन पैसे तर मिळतातच, शिवाय भविष्यात त्यांना जगण्याचे एक चांगले साधनही उपलब्ध होणार आहे. 
-मंगेशी मून, सामाजिक कार्यकर्त्या 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT