Underground temples of Kudenandgaon in Chandrapur district 
विदर्भ

(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर

नीलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत.

इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत.

गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.

मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...!

गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत.

आता भिवकुंड झाली गावाची ओळख...

कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदलकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

Mahavitaran Recruitment : विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; ६ व ७ नोव्हेंबरला कागदपत्रांची पडताळणी

Kolhapur Election : 'पदवीधर'ची बाजारात 'तुरी', महायुतीत वादाची 'धुरी'; मंत्री चंद्रकांत पाटील-हसन मुश्रीफ यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा

SCROLL FOR NEXT