शेंदोळाखुर्द (जि. अमरावती) : येथील भारतीय जवान सुधीर भीमराव वानखडे हे बोराळा गावातील आदिवासी युवकांना सैनिकी प्रशिक्षण देत आहेत. परंतु या मुलांकडे परीक्षेची तयारी करण्यासाठी दर्जेदार पुस्तके नव्हती. याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये 30 जुलैला प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि त्यांची कन्या आकांक्षा ठाकूर यांनी घेतली. तथा, रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आकांक्षा ठाकूर यांनी सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या भावांना 50 पुस्तके भेट दिली.
सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांकडे परीक्षेच्या तयारीसाठी योग्य पुस्तके नसल्याचे वृत्त ‘सकाळ'मध्ये प्रकाशित होताच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुलगी आकांक्षा ठाकूर यांनी वेळ न दवडता बोराळा गाव गाठले. सुरुवातीला गावातील महिला- भगिनींनी आकांक्षाची ओवाळणी घातली आणि नंतर सरपंच संजय भास्कर, उपसरपंच प्रदीप जाबू, तंटामुक्ती अध्यक्ष भारत जाबू, पोलिस पाटील सागर जाबू, सामाजिक कार्यकर्ते मनिराम चिलोटी, प्रशिक्षक सुधीर वानखडे यांनी स्वागत केले.
आकांक्षा ठाकूर यांनी सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या भावांना ओवाळून त्यांना राखी बांधली आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी 50 पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमप्रसंगी युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस प्रद्युम्न पाटील, तिवसा पंचायत समितीचे उपसभापती शरद वानखडे, धम्मराज खडसे, अभिजित चक्रे, सौरभ वानखडे, गावातील आरोग्य प्रशासनातील कर्मचारी व काही गावकरी मंडळी उपस्थित होती. कोरोना विषाणू संबंधीचे नियम पाळून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
अवश्य वाचा- सावधान! युवकाच्या खात्यातून ९५ हजार लंपास, कस्टमरकेअरच्या नावाने असलेले नंबर नक्की कोणाचे?
आम्ही दोन महिन्यांपासून भारतीय जवान सुधीर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. परंतु आम्हाला वाचनासाठी दर्जेदार पुस्तके नव्हती. याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना समजताच त्यांनी आम्हाला त्यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर यांच्या हस्ते रक्षाबंधनाची ही भेट दिली. त्याबद्दल पालकमंत्री व ‘सकाळ'चे आभार मानतो.
-श्याम जावरकर
प्रशिक्षणार्थी.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.