unknown person attack on doctor in gurukunj mojhri of amravati 
विदर्भ

गुरुकुंज मोझरीतील निवासी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक

प्रशिक मकेश्वर

तिवसा( जि. अमरावती ) : जिल्ह्यातील गुरुदेवनगर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुदेव आयुर्वेदीक रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. मनोज सांगळे, असे प्राणघातक हल्ला झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांच्यावर सध्या अमरावतीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  

गुरुकुंज मोझरी मधील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये मनोज सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कर्यरत आहे. नेहमीप्रमाणे शनिवारीही रुग्णालयातील काम संपल्यानंतर त्यांच्या खोलीमध्ये आराम करायला गेले. अशातच रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या मागील दरवाज्यातून हल्लेखोर आता शिरले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला चढविला आणि तिथून पळ काढा. हल्लेखोरांनी केलेला हल्ला इतका भयंकर होता की मनोज सांगळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

अशातच त्यांनी त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला फोन करून झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिल्यानंतर डॉक्टर मजोज सांगळे यांना उपचारासाठी तात्काळ अमरावतीला रवाना करण्यात आले आहे.  सध्या अमरावती मधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे . दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गुरुदेव नगरात गेल्या 25 दिवसांत चार घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या, तर काल रात्री झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये अज्ञात व्यक्ती कैद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. याप्रकरणी पुढील चौकशी तिवसा पोलिस करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT