Unknown person end life of coal businessman in Rajura chandrapur  
विदर्भ

सलूनमध्ये घुसून कोळसा व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; चंद्रपुर जिल्ह्यात घडला थरार

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोळसा व्यवसायात असलेले रामपूर येथील राजू यादव (वय ४५) यांची नाका नंबर 3 राजुरा येथे साळुंचे दुकानात अज्ञात इसमाने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना सायंकाळी ६ वाजता घडली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजू यादव हे जय भवानी ट्रक असोसिएशनचे सचिव असून त्यांचे स्वतःचे बजरंगबली ट्रान्सपोर्ट आहे ते बजरंग दलाचे महासचिव होते. बऱ्याच वर्षांपासून ते कोळसा वाहतुकीचा व्यवसाय करीत असून वेकोली परिसरात त्यांची चांगली ख्याती होती.

ऐन वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजुरा शहरातील नाका नंबर 3 येथे सलूनच्या दुकानात दाढी करीत असताना अज्ञात इसमानी दुकानात येऊन राजू यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. 

घटना घडल्यानंतर पोलीस उशिरा पोहचले असता घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाका नंबर तीन हे वर्दळीचे ठिकाण असताना त्याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी राहत नसून अवैद्य व्यवसायचे सूत्र चालणारे ठिकाण म्हणून नाका नंबर तीन असताना पोलिसांकडून या ठिकानाकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा आरोप होत होते, 

राजुरा शहरात पहिल्यांदा हि घटना घडल्याने शहरात पोलिसांबद्दल व अवैद्य व्यवसायाबद्दल ओरड होत आहे. मात्र कोळसा व्यावसायिक राजू यादव यांच्या हत्येने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT