file photo 
विदर्भ

नागपूर शहरात शस्त्रांचा वापर वाढला

अनिल कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या उपराजधानीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहेत. शहरात गुंडांच्या टोळ्यांची संख्या वाढत असून प्रत्येक टोळीकडे पिस्तूल आणि अन्य तिष्ण शस्त्रांची भरमार आहे. गेल्या पाच वर्षात नागपूर पोलिसांनी तब्बल एक हजार 757 शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये पिस्तूल, रिव्हाल्वर, माऊझर, गुप्ती, तलवार, चाकू, सुरा, कुकरी आणि सत्तूर आदी तिष्ण शस्त्रांचा समावेश आहे. उपराजधानीची वाटचाल "गुन्हेगारपूरा'कडे होत आहे. शहरात गॅंगवॉर वाढत असून गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या तयार होत आहेत. टोळीचे म्होरके वसुली, हप्ते आणि खंडणीतून मिळवलेल्या पैशातून पिस्तूल किंवा धारदार शस्त्रे विकत घेतात. त्यामुळे शहरातील जवळपास प्रत्येक गॅंगकडे अवैधरित्या घेतलेले दोन-तीन पिस्तूल आढळतातच. शहर पोलिस दलातील काही भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांमुळे अवैध शस्त्रविक्रेत्यांना आणि गॅंगमधील सदस्यांना संरक्षण मिळत असल्याने दिवसेंदिवस टोळ्यांची ताकद वाढत आहे. गेल्या पाच वर्षात 180 पेक्षा जास्त पिस्तूल आणि दीड हजारांपेक्षा जास्त तिष्ण हत्यारे पोलिसांनी जप्त केलीत. पोलिसांचा वचक कमी आणि खाऊवृत्ती वाढल्यामुळेच शहरातील गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे.
कुठून येतात शस्त्रे ?
देशीकट्ट्यासह विदेशी बनावटच्या पिस्तूल शहरात सहज उपलब्ध होतात. फक्‍त दहा हजारपासून ते 60 हजार रूपयांपर्यंत पिस्तूलाची किंमत नागपुरात आहे. उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, बिहार या राज्यातून महाराष्ट्रात पिस्तूल आणल्या जातात. तर मध्यप्रदेशातील दावलबेडी, उंडीखोदर, सिरवेल, सिंगनू, अंबा, नवलपुरा आणि सीतापुरा या परिसरात देशी पिस्तूल बनविल्या जातात. हा कारोबार कोट्यवधीच्या घरात आहे.
सीमा सील तरीही तस्करी
महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून सीमाही सील करण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य राज्यातील शस्त्रतस्कर पोलिसांशी "सेटींग' करून महाराष्ट्रात शस्त्रपुरवठा करतात. पिस्तूल सापडल्यास पोलिस केवळ कागदी घोडे नाचवून गुन्हा दाखल करतात. मात्र, ती पिस्तूल आली कुठून? कुणी विकत घेतली? कोणत्या टोळीचा हात आहे? या सर्व भानगडीत पडत नाही.
गुन्हे शाखा सतर्क
शहरातील प्रत्येक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यामुळे शस्त्र असल्याची माहिती असल्यास गुन्हे शाखा तत्परतेने कारवाई करते. ऑपरेशन क्रॅकडाऊन, ऑपरेशन वॉशआऊट राबवून गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला आहे. आतापर्यंत अनेक छापे घालून पिस्तूल जप्त केल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवणार आहे.
-निलेश भरणे, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

SCROLL FOR NEXT