The use of scaly cats to make money Gadchiroli news 
विदर्भ

धक्कादायक! मांत्रिकाला हवी अंगावर तीळ नसलेली स्त्री; खवल्या मांजरद्वारे पाडणार होते पैशांचा पाऊस

मिलिंद उमरे

गडचिरोली : चामोर्शी तालुक्‍यात खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी अटक झालेल्या आरोपींना वनकोठडी मिळाल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी आपला खाक्‍या दाखवताच बरीच खळबळजनक माहिती मिळाली आहे. आरोपींनी केवळ तस्करीसाठ नव्हे तर कजलीसाठी म्हणजे गुप्तधन शोधण्यासाठी खवल्या मांजराचा वापर करायचे ठरवले होते. एका मांत्रिकाशी संधान साधून पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धापूर्ण स्वप्नाच्या आहारी जाऊन त्यांनी हा कारनामा केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.

पोलिस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेने चामोर्शी पोलिस स्टेशनअंतर्गत कुदरसी टोला येथे खवल्या मांजरासह तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली. त्यानंतर आणखी एका आरोपीला वनविभागाने अटक केली. आरोपींसह खवल्या मांजर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली होती.

तेथे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कौशल्याने त्यांना विचारणा केल्यानंतर अनेक गुपिते उघडकीस आली आहेत. यातील एका आरोपीचा मांत्रिकाशी संपर्क झाला होता. त्याने खवल्या मांजरावर तंत्रमंत्र करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी हा दुर्मिळ प्राणी हवा असल्याचे सांगितले. त्यामुळे या आरोपीने शोधाशोध सुरू केल्यावर नागपूरच्या एका गावातील परिसरातून एका आदिवासीकडून तीन आरोपींनी हे खवल्या मांजर मिळविले.

इसमाला १५ लाख मिळतील, असे आमिष दिले होते. एकूण याप्रकरणी दीड कोटीचा व्यवहार होणार असल्याची माहितीही मिळत आहे. पण, हे आरोपी पकडल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सावध होऊन फरार झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणे अधिकच कठीण झाले असून, वनविभाग इतर आरोपी व मुख्य सूत्रधारांचाही शोध घेत आहे. आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

लांबवर धागेदोरे

या प्रकरणाचे धागेदोरे बरेच लांबवर असल्याचे दिसून येत आहे. हे केवळ तस्करीचे प्रकरण नसून अंधश्रद्धेचा बाजार मांडून वन्यजीवांसोबत अनेकदा मानवी जीव घेणाऱ्यांच्या टोळीचाही यात समावेश असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. आतापर्यंत गुप्तधन किंवा इतर जादुटोण्यासाठी घुबड, कासव, मांजर, साप आदी प्राण्यांचा वापर व्हायचा.

पण, आता यात खवल्या मांजराचा वापर होत असल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. शिवाय ही टोळी अंगावर कुठेही तीळ नसलेली स्त्री, पायाळू व्यक्ती यांचाही वापर करीत असल्याचे कळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगानेही या प्रकरणाचा तपास होणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT