स्टुडंट पोर्टल
स्टुडंट पोर्टल SAKAL
विदर्भ

वर्धा : ‘सरल’ प्रणाली झाली ‘वेडीवाकडी’

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : शालेय शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे. आता राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना पडताळणी करून त्याचा अहवाल १ ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सादर करावा लागणार आहे.

स्टुडंट पोर्टलमध्ये समान नाव असलेले विद्यार्थी एका शाळेत वेगवेगळ्या वर्गांमध्ये अथवा वेगवेगळ्या शाळांमध्ये नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थी प्रत्यक्षात नक्की कोणत्या शाळेत व कोणत्या वर्गात शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेमार्फत शाळांना भेट देऊन पडताळणी करावी लागणार आहे. ज्या शाळेतील ज्या वर्गामध्ये विद्यार्थी दुबार नोंद झालेले आहेत, अशा दुबार नोंदी जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्यात यावेत. एकच आधार क्रमांक एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या नावासमोर नमूद केला असल्यास याही विद्यार्थ्यांची पडताळणी करून योग्य त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्याचा आधार क्रमांक कायम ठेवण्यात येऊन इतर विद्यार्थ्यांच्या नावासोबत नमूद केलेला आधार क्रमांक काढून विद्यार्थ्यांच्या अचूक आधार क्रमांकाची नोंद करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी बजावले आहेत.

सरल प्रणालीत चुकांचा कळस

आधार अपडेशनची कामे कामे करताना शाळांकडून सरल प्रणालीत चुकांचा कळस गाठला आहे. एकच विद्यार्थी दोन इयत्तांत, वेगवेगळ्या शाळांमध्ये दिसत असल्याने शाळांची संचमान्यता करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी याची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी बजाविले आहे. सद्यःस्थितीत राज्यात शाळांतील विद्यार्थ्यांचे १५-२० टक्के आधार अपडेशन काम बाकी असल्याने यंदाच्या संचमान्यतेत शाळांतील शिक्षक संख्येत घट होऊन राज्यातील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT