Vidarbha movement  
विदर्भ

Separate Vidarbha: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी १ जूनला ‘गजाननाला साकडे'; आक्रोश मेळावाही होणार

Latest Marathi News: स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या ११८ वर्षापासून सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola News: स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या ११८ वर्षापासून सुरु आहे. हा लढा निर्णायक टप्प्यावर असून येत्या ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मागणी निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन तयार होईल.

या लढ्याचा एक भाग म्हणून एक जूनरोजी शेगाव येथे संत गजाननाला साकडे व विदर्भ आक्रोश मेळावा आयोजित केल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी दिली.

आंदोलनाच्या अनुषंगाने येथे विश्रामगृहात ॲड. चटप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी समितीच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, सुरेश जोगळे, शंकरराव कवर, सतीश देशमुख, डॉ. निलेश पाटील, गजानन अहमदाबादकर, लक्ष्मीकांत कौठकर, राजभाऊ ठाकरे, राजकुमार भट्टड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. चटप म्हणाले, आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ राज्य मिळवू औंदा या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने व ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विदर्भ राज्याची मागणी निकाली काढण्याच्या दृष्टीने करू किंवा मरू, जिंकू किंवा मरू अथवा जेल मध्ये सडू हे ऐलान केले आहे.

त्यानुसार पश्‍चिम विदर्भातील सर्व जिल्हयात या आंदोलनाची धग पोचविण्याच्या दृष्टीने १ जून रोजी शेगाव येथे संत गजाननाला साकडे व विदर्भ आक्रोश मेळावा घेतला जाणार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य उत्पन्नाच्या दीडपटीपेक्षा जास्त म्हणजे ६ लाख ६० हजार कोटी कर्जाच्या बोझ्याखाली दबले आहे.

शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी भूसंपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी सरकारने ६५ हजार कोटींचे कर्ज घेण्यास एमएसआरडीसीला मान्यता प्रदान केली असून सरकारने थकहमी दिली असल्याने त्याचाही बोजा राज्याच्या तिजोरीवरच आहे. (Latest Marathi News)

राज्य स्वतःच्याही वर्षभराच्या आवश्‍यक व किमान गरजा भागवू शकत नसल्याने विदर्भाचा नागपूर कराराप्रमाणे सिंचनाचा ६० हजार कोटी रुपयांचा रस्ते, पिण्याचे पाणी, उद्योग, उर्जा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आदिवासी विकास व समाजकल्याण विभागाचा १५ हजार कोटीचा असा एकूण ७५ हजार कोटींचा अनुशेष कदापिही भरून काढू शकत नाही.

त्यामुळे विदर्भातील १३१ धरणे व कालवे पूर्ण होऊन १४ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकत नाही.

परिणामी सिंचनाचा व इतर क्षेत्रातील अनुशेष भरून निघू शकत नाही. सरकारची गुंतवणुकीची क्षमता संपल्याने २६ पैकी २३ खनिजे व सरप्लस वीज विदर्भात असूनही भारनियमन थांबू शकत नाही. विजेचे दर नियंत्रणात येत नाहीत. बेरोजगारीचा प्रश्‍न उभा आहे. याचे उत्तर स्वतंत्र विदर्भ राज्य हेच आहे, असेही ॲड. चटप म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT