सोयाबीन sakal
विदर्भ

सोयाबीन आलंय भरात, भाव गेले पाताळात; शेतकऱ्यांनो जा वखारीत!

सोयाबीनचे भाव प्रचंड गडगडल्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी गोदामाचा फायदा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : सद्यस्थितीत अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीनचे भाव प्रचंड गडगडल्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी गोदामाचा फायदा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयाबीनचे भाव प्रचंड गडगडले आहेत. अगदी ११ हजारावरील भाव ६ हजारावर येऊन पोचले आहेत, ते नक्कीच वाढणार आहेत, मात्र त्यासाठी सबुरी धरणे गरजेचे आहे. शासकीय गोदामांचा सहारा घेऊन शेतकरी या अडचणीतून बाहेर पडू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.

मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला बऱ्यापैकी पाऊस न झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशीरा पेरण्या केल्या. दरम्यान सार्वत्रीक अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली. शेती बुडाली. या तालुक्यातही नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसून प्रचंड नुकसान झाले. नदीकाठी नसणाऱ्या शेतांमधील सोयाबीनसह सर्वच पिके सध्या चांगली आहेत. त्यापैकी कापसाला पर्याय म्हणून समोर आलेले नगदी पीक सोयाबीन आहे व ते सध्यातरी या तालुक्यात सुस्थितीत आहे, परंतु भाव गडगडल्याने शेतकरी हवालदील आहे. २ महिन्यात सोयाबीनचे भाव वाढतील, मात्र तोवर शेतकरी थांबू शकत नाही. त्यासाठी एक सक्षम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. तो म्हणजे शासकीय वखारी किंवा गोदामांचा. या वखारी मध्ये सोयाबीन ठेवल्यास त्यावर शेतकऱ्यांना ७० टक्के कर्ज केवळ ६% व्याजदराने मिळते. या वखारींमधील ७५ टक्के जागा शेतकऱ्यांसाठी राखीव आहे. त्याचा फायदा केवळ व्यापारीवर्ग घेतो, तो आपला हक्क शेतकऱ्यांनी कुणालाही हिरावून घेऊ देऊ नये. २ महिन्यांनी भाव वाढताच सोयाबीन विकून आर्थिक फायदा घेणे शेतकऱ्यांना शाक्य आहे.

वखारीत धान्य ठेवल्यास सुविधा

कुठल्याही वखारीत धान्य ठेवल्यास शेतकऱ्यांना ९ ते ११ टक्के व्याजदराने ठेवलेल्या मालाच्या ७० टक्के कर्ज मिळते. बाजार समितीमार्फत ठेवल्यास पणन महासंघाची सबसिडी मिळून केवळ ६ टक्के व्याजदराने अर्थपुरवठा होतो. गोदामात धान्य ठेवल्याची पावती बँकेत सादर केली, तर बँक कर्ज देते. खासगी वखारींमध्ये कृषीमाल ठेवल्यास कर्ज मिळते, फक्त सबसिडी मिळत नाही.

हा पर्याय नामी आहे. पण बहुतांश शेतकरी त्यापासून अनभिज्ञ आहेत. शेतकऱ्यांचे जागरण होणे आवश्यक आहे. आम्ही त्यासंदर्भात गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहोत.

- अरूण बोंडे. शेतीचे अभ्यासक, मूर्तिजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Crisis: हजारो प्रवाशांना दिलासा! परतफेड ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा अन्...; इंडिगोला सरकारचा अल्टीमेटम

Indian Railway: इंडिगोची ‘ग्राउंडेड’ गोंधळगाथा; रेल्वे बनली लाखोंची अंतिम तारणहार! 7 विशेष गाड्यांची घोषणा, पण कुठे?

दक्षिण मुंबईत रिक्षाला का परवानगी नाही? कारण काय

'कैरी'च्या सेटवरची धमाल मैत्री! सायली–सिद्धार्थची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सगळ्यांना भुरळ घालणारी!

Latest Marathi News Live Update : अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धुळ्यात छापा, दोघांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT