Vidarbha gets second dose of corona vaccine corona vaccine news 
विदर्भ

विदर्भाला मिळाला कोरोना लसींचा दुसरा डोस; अकरा जिल्ह्यांसाठी १ लाख ५७ हजार लस

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सद्या लसीकरणाची मात्रा जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबादेतील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनसह ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्डच्या दोन लाख लस विदर्भात आल्या होत्या. गुरुवारी लसीचा दुसरा डोस पोहोचला आहे. विदर्भाला एक लाख ५७ हजार लस मिळाल्या आहेत. नागपूर विभागाला ९६ हजार तर अकोला विभागाला ६१ हजार लस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फात वितरित करण्यात आल्या.

विदर्भात आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस कोरोना लसीकरण सुरू आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना लस टोचल्याच्या २८ दिवसांनंतर दुसरा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना काळात प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. सध्या लसीकरणाचा वेग मंद आहे. मात्र लसीकरणाबाबत पसरलेले गैरसमज दूर होत असून हा वेग वाढेल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

२४ तासांत ६ कोरोनामृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ३५५ नवीन बाधितांची भर पडली. यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख ३३ हजार ३४५ झाली आहे. २५० बाधित कोरोनामुक्त झाले. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्तांची संख्या १ लाख २५ हजार ९१७ झाली. आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार १४६ जण दगावले आहेत. सद्या ३ हजार २८२ रुग्ण असून २ हजार २३२ रुग्ण गृहविलगीकरणात तर उर्वरित विविध रुग्णालयात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT