विदर्भ

Vidhan sabha 2019 : उमरेडमध्ये काँग्रेसकडून कोण लावतोय ताकद 

वीरेंद्रकुमार जोगी

नागपूर : उमरेड विधानसभा मतदारसंघात पारवे विरुद्ध पारवे असा सामना होत असून, कुठल्या पारवेंना मतदार विधानसभेत धाडतात याकडे लक्ष लागले आहे. भाजपने तिसऱ्यांदा आमदार सुधीर पारवे तर कॉंग्रेसने त्यांचेच चुलतबंधू राजू पारवे यांना उमेदवारी देऊन येथे रंग भरला. कॉंग्रेसच्या पारवेंसाठी राजेंद्र मुळक यांनी ताकद लावली असून, सुधीर पारवे स्वभावाप्रमाणे शांतचित्ताने प्रचार करीत आहे. 
उमरेड विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मुळक यांचा प्रभाव कायम आहे. ते यंदा उमेदवार नसल्याने उमरेडवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच सर्वांचा विरोध पत्करून त्यांनी राजू पारवे यांना कॉंग्रेसची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. ते स्वत: राजू पारवे यांच्या प्रचारासाठी धुराळा उडवित आहे. राजू पारवे यांनी आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघ पिंजून काढला आहे. आपला माणूस असा ते स्वत:चा प्रचार करीत आहे. त्यांना संजय मेश्राम यांचेही पाठबळ असल्याने हौसला बुलंद झाला आहे. ग्रामीण भागात स्वत: मुळक राजू पारवे यांच्यासह दौरे करीत असल्याने ही जमेची बाजू ठरली आहे. मात्र, निवडणूक लढताना केवळ पाठिंबाच गरजेचा नाही, हे त्यांना अद्याप उमगले नसल्याने त्यांच्या प्रचारात कमतरता बऱ्याच आहे. त्याचा मोठा फटका मतदानाच्या वेळी बसू शकतो, असे चित्र दिसू लागले आहे. 
राजू पारवे हे गावागावांतून प्रचार करीत असले तरी त्यांच्यासमोर संघटित असलेल्या भाजपचे आव्हान आहे. दोन वेळा विजय मिळविणारे सुधीर पारवे हे भाजपच्या संघटित प्रचारामुळे निवडून आले आहे. याचमुळे त्यांचा प्रचार राजू पारवे यांच्या तुलनेत प्रभावी ठरणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पारंपरिक मतदार असलेल्यांच्या भरवशावर ही निवडणूक भाजपसाठी यावेळी सोपी राहिलेली नाही. मात्र, मागील निवडणुकीत बसपकडून लढणारे रुक्षदास बन्सोड हे निवडणुकीसाठी तयार नसताना वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीच्या वेळी ते दुसऱ्या स्थानी होते. यावेळी ते कुणाची मते खाणार यावरही विजयी उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Law Reforms: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! आता 'या' गुन्ह्यांसाठी तुरुंगवास होणार नाही, रद्द केलेले १३ नियम कोणते?

आजोबा राज्यपाल आणि गर्भश्रीमंत घराणं ! अभिनयासाठी घरातून पळाला पण कामामुळे खाल्ला बायकांकडून चपलांचा मार

IND vs AUS 1st T20I : पावसाने वाट लावली, षटकांची संख्या कमी झाली! जाणून घ्या मॅच पुन्हा किती वाजता सुरू होणार

नगराध्यक्षपदासाठी जयंत पाटलांचा महत्त्वाचा निर्णय; 'या' नेत्याला उतरवलं मैदानात, जगात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला दिलं खुलं आव्हान

IND vs AUS 1st T20I : एवढा लाड! Harshit Rana वरून नेटिझन्सनी गौतम गंभीरला झोडले; फलंदाजीतही दिलंय प्रमोशन, अर्शदीप पुन्हा बळीचा बकरा...

SCROLL FOR NEXT