vijay wadettiwar says to investigate chichpalli fire in chandrapur
vijay wadettiwar says to investigate chichpalli fire in chandrapur 
विदर्भ

चिचपल्लीतील आगीची तज्ज्ञांकडून चौकशी होणार, वडेट्टीवारांनी जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक बाबींची माहिती असलेल्या तज्ज्ञ सदस्यांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी सांगितले. 

चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची निर्माणाधीन इमारत गुरुवारी (ता.२५) आगीत जळाल्याने त्याची पाहणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवडे, चिचपल्ली बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या संचालक के. एम. अभर्णा, वनाधिकारी सुशील मंतावार उपस्थित होते. 

अपघातग्रस्त रुग्णांची सांत्वना -

सिंदेवाही येथे गुरुवारी लग्न वऱ्हाड्यांच्या ट्रकला झालेल्या अपघातात जखमींची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन चौकशी केली. यावेळी रुग्णालयात भरती असलेल्या देवराव अटरगडे, यशवंत मेश्राम, मंजू कोरटनाके, पवन टिकरे, आलिशा उईके, निशा मेश्राम व इतर जखमींना काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल, असा धीर त्यांनी दिला. मतदार संघात मोठा अपघात झाल्याने सर्व कामे थांबवून जखमींना पाहण्यासाठी मुंबईहून तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता नीलेश तुमराम, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख ललित तामगाडगे, समन्वयक उमेश आडे सोबत होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT