village in amravati district has no cemetry for funeral
village in amravati district has no cemetry for funeral  
विदर्भ

विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले जातात अंत्यसंस्कार; शोधावी लागते जागा 

नितीन पाटील

काकडा (जि. अमरावती) ः मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र प्रशासकीय लालफीतशाहीला मानवतेचा कळवळा असतोच, असे नाही. पर्यायाने मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते. हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल. स्मशानभूमी नसल्याने काकडा येथील नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात, ही एक शोकांतिका आहे.

आजच्या परिस्थितीत कोणत्याही लहानमोठ्या गावात रस्ते असो की नसो, नाल्यांची दुरवस्था असो मात्र स्मशानभूमी ही असतेच. परंतु त्याला काकडा हे गाव अपवाद ठरले आहे. गावातील अनेकांच्या पिढ्या गेल्या मात्र या गावात स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे. स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असतानाही गावात साधे स्मशानभूमीचे शेड नाही. ही बाब दुर्देवाची म्हणावी लागेल. 

विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींकडून कुठलाही पाठपुरावा नसल्याने ही समस्या कायम आहे. स्मशानभूमीच नसल्याने बहुतांश मृतदेहांवर शिंदी बु. येथील वळणरस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.

उन्हाळा, पावसाळा तसेच कडाक्‍याच्या थंडीत अंत्यसंस्काराला येणाऱ्यांची पार त्रेधातिरपट उडते. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पिढ्यान्‌ पिढ्या अशीच परिस्थिती चालत आल्याने आजचे चित्र समोर आहे. गावकरी तसेच लोकप्रतिनिधी मिळून स्मशानभूमीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.

काकडा येथे हिंदू स्मशानभूमीसंदर्भात ग्रामपंचायतमधून सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविण्यात आला आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
-ईश्‍वरदास वानखडे,
 सरपंच.

काकडा येथे हिंदू स्मशानभूमीचे शेड नसल्याने नागरिकांना आप्तस्वकियांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी प्रशासनकडे शेडची मागणी करण्यात येईल.
-देवेंद्र पेटकर, 
पं. स. सदस्य.

हिंदू स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्‍न निकाली काढावा.
-अविनाश भोंडे, 
नागरिक.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT