villagers caught two soybean thieves In Amravati 
विदर्भ

मध्यरात्री गावकरी शांत झोपले असताना झाली हालचाल; येऊन पाहताच चौघांना दिला चोप

संतोष ताकपिरे

अमरावती : शेतात काढलेले सोयाबीन शेतकऱ्याने घरासमोर प्लॅस्टिक ताडपत्रीखाली झाकून ठेवले होते. परंतु, रात्रीला त्या ढिगाऱ्यावरून ही पोती एका वाहनात टाकून लंपास करणाऱ्या चौघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. लोणी ठाण्याच्या हद्दीत जळू फाट्याजवळ ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमानंद नारायण केकने (वय ५०), राजेंद्र शंकर पवार (वय ३९), हिवरेश हिवराज भोसले (वय १९), किसन किशोर राठोड (वय १८, सर्व रा. आजंती बेडा, नेरपरसोपंत) अशी अटकेतील चौघांची नावे असल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले. चौघांविरुद्ध सोयाबीन चोरीचा गुन्हा लोणी ठाण्यात दाखल झाला आहे.

कुणाल राजेंद्र पाटील (वय २८) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. पाटील यांनी शेतात पिकविलेले सोयाबीनचे ३१ कट्टे अंगणात आणून ठेवले होते. परंतु, रात्री कुणीतरी ते कट्टे उचलून काही अंतरावर असलेल्या वाहनात टाकत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाटील यांनी गावातील काही लोकांना उठवून सोयाबीन चोरी करणाऱ्या चौघांना पकडून चोप दिला.

त्यानंतर त्यांना लोणी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यापूर्वी त्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता. सोयाबीनचे ३१ कट्टे व ज्या वाहनातून हे कट्टे नेण्यात येणार होते ते एमएच २९ एटी ०४६० क्रमांकाचे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Flipkart वरून फूड डिलिव्हरी कधी सुरु होणार? Zomato-Swiggy ला टक्कर देण्यासाठी कंपनीची खास रणनीती

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT