wishbadha 
विदर्भ

गावकऱ्यांनी केले हळदीचे जेवण अन्‌ असे काही घडले की...

सकाळ वृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील झरप या गावातील एका लग्नघरी बुधवारी (ता. 26) आयोजित हळदीच्या जेवणातून विषबाधा झाली. यात सुमारे 35 ते 40 पाहुणे मंडळींची प्रकृती बिघडून त्यांना औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. 

जेवणातून झाली विषबाधा

झरप येथील दयाराम कोरे यांच्या मुलीचे लग्न पवनी तालुक्‍यातील आसगाव येथील तरोणे यांच्या मुलाशी जुळले होते. बुधवारी वरमंडपी लग्न सोहळा असल्याने मंगळवारी (ता.25) झरप येथे नवरी मुलीच्या घरी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांनी रात्री जेवण केले. मात्र, बुधवारी सकाळपासून पाहुणे मंडळी आणि गावकऱ्यांना उलटी व हगवणीचा त्रास होऊ लागला. विषबाधितांसह नातेवाईकांनी मुरमाडी (तुप) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच गर्दी केली. 

अन्न व पाण्याचे नमुने तपासणीला पाठविले

रुग्णांवर तातडीने उपचारालासुद्धा सुरुवात झाली. यातील मुरमाडी (तुप) येथील आरोग्य केंद्रात 103 लोकांवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली तर 35 ते 40 विषबाधितांवर आसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. रुग्ण वाढण्याच्या शक्‍यतेने गावातील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली. कोरे यांच्या घरातील अन्नाचे व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली यावर तपास सुरू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे यांनी सांगितले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT