Vinod Bhoyar is teaching students by making things using waste  
विदर्भ

टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांना टिकावू शिक्षण; विनोदी 'वऱ्हाडी' बोलीभाषेतून विद्यार्थी होणार साक्षर 

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड क ( जि. अमरावती) :  शालेय शिक्षण म्हटलं तर आठवतो तो खडू व फळा, पण याशिवाय सुद्धा मुलांचे शिक्षण होऊ शकते ? होय हे सिद्ध करून दाखविले आहे अमरावती जिल्ह्यामधील धामणगावरेल्वे तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा गोकुळसरा येथील शिक्षकाने. आपल्या घरातील व परिसरातील टाकाऊ पदार्थांपासून टिकावू पद्धतीचे शैक्षणिक साहित्य तयार करून दीर्घकाळ स्मरणात राहील अशा "विनोदी' वऱ्हाडी बोलीभाषेतून विनोद भोयर हे मुलांना शिक्षण देत आहेत. सध्या शाळा बंद असल्या तरी त्यांचे शैक्षणिक साहित्य निर्मितीचे कार्य मात्र अव्याहतपणे  सुरू आहे.

सर्व शिक्षा अभियान सुरू झाल्यानंतर शिक्षकांना शिक्षक अनुदान म्हणून 500 रुपये अनुदान मिळायचे. इतरत्र केवळ त्याचे लेखी रेकॉर्ड जतन केल्या जात होते. मात्र विनोद भोयर यांनी गेल्या 20 वर्षापासून हे सातत्य कायम ठेवले आहे. कित्येकांचे साहित्य केवळ प्रदर्शनीपुरते तयार व्हायचे व घरीच राहायचे, मात्र श्री. भोयर यांचे साहित्य अद्यापही कायम वर्गखोलीत आहे. 

फटाक्‍यांच्या रिकाम्या नळ्या, पृष्ठ, प्लायचे तुकडे, नटबोल्ड, खिळे, लाकडी ठोकळे, सायकल स्पोक, निकामी डब्याचे झाकण, पत्त्याचे बॉक्‍स, वेल्डिंगच्या रिंग, इलेक्‍ट्रिक केसिंग तुकडे, चुंबकाचे तुकडे, दोरी, वृत्तपत्र कात्रण, डीसी मोटर्स, खर्डे आदी विविध वस्तूंपासून हे साहित्य तयार करतात. 'धागा फिरवा उत्तर मिळवा' या साहित्याला यापूर्वी राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना काळातही साहित्य निर्मिती

शाळा बंद असल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून घरबसल्या अनेक साहित्याची निर्मिती या काळात केलेली आहे. घरी हे कार्य करत असल्याने त्यांची मुलगी सुहानी हिनेसुद्धा अनेक कार्यानुभव आधारित सुंदर साहित्याची निर्मिती केली आहे. शालेय मुलांमुळे आपले घर चालत असल्यामुळे आपल्या वेतनातील किमान 2 टक्‍के खर्च नियमितपणे या साहित्यावर करतात. लॉकडॉउन नंतर त्यांचे शाळेतील "बोलकी बाहुली' शिक्षकांच्या अनुपस्थित उत्तर देणार असल्याचे भोयर यांनी सांगितले.

जुगाडातून शेती साहित्य
 
शेतीमध्ये खर्चिक साहित्य विकत आणण्यापेक्षा "जुगाड'तंत्रातून काही शेती साहित्याची निर्मितीही विनोद भोयर यांनी कोरोना काळात केली आहे. बाजारात बाराशे रुपये मूल्य असलेले तन कापणीयंत्र त्यांनी केवळ 300 रुपयात तयार केले आहे. सोबतच आवाजाची बंदूक 150 रुपयात तयार करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना हे केवळ साहित्य खर्चात उपलब्ध करून दिले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT