home_quarantine.jpg 
विदर्भ

होम क्वारंटाइन शिक्के पुसून फिरत होते बिनधास्त; मग घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : होम क्वारंटाइनचे आदेश झुगारत हातावरील शिक्के पुसून गावात फिरणाऱ्या वडगाव खंडोपंत येथील दोन युवकांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी सोमवारी (ता.23) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे तालुकाभरात खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथील दोन युवक पुणे येथून घरी आले होते. त्यांना रविवारी (ता.22) बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने घरातच अलगीकरण (होम क्वारंटाइन) मध्ये राहण्याचे निर्देश दिले होते. दोघा युवकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले होते. परंतु दोघे जण हातावरील शिक्के पुसून गावात फिरत असल्याची गंभीर बाब सोमवारी (ता.23) सकाळी 11 वाजता उघडकीस आली. 

होम क्वारंटाइनच्या आदेशाचे उल्लंघन
या प्रकाराची माहिती मिळताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने दोघांना पकडून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यातील एका युवकाचे वय अंदाजे 20 तर दुसऱ्याचे 21 वर्ष असल्याचे समजते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत प्रशासन खबरदारी घेत आहे. दरम्यान, वडगाव खंडोपंत येथील संबंधीत युवकांनी होम क्वारंटाइनच्या आदेशाचे उल्लंघन करणे गंभीर बाब आहे. 

दोघा कर्मचाऱ्यांची तक्रार देण्यासाठी बोराखेडी पोलिसांत धाव
याची दखल घेत मोताळा तहसीलदार व्ही.एस. कुमरे यांनी पिंप्रीगवळी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रामचंद्र पाटील व वडगाव खंडोपंत ग्रामपंचायतचे सचिव उद्धव सुभाषराव डुकरे यांना संबंधीत दोघा युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोघा कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी बोराखेडी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी दोघा युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात एएसआय विनोद शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

PM मोदी आणि मॅक्रॉन मुंबईत, प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘रेड लाइन’ सज्ज; एप्रिलपासून मेट्रो धावणार, २३ किमी मार्गाच्या चाचण्या यशस्वी..

MHADA Mumbai Lottery : मुंबईत स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी ! म्हाडाच्या FCFS सदनिकांसाठी आजपासून अर्ज नोंदणी सुरु, काय आहे प्रक्रिया ?

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT