Voting begins for Amravati Division Teachers Constituency 
विदर्भ

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात; केंद्रावर चोख व्यवस्था तैनात

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मतदान केंद्रावर चोख व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

काही केंद्रांवर सकाळपासून शिक्षकांनी हजेरी लावली होती. त्यांची तपासणी करून मतदान केंद्रात सोडण्यात येत आहे. ३५ हजारांवर मतदार असून किती शिक्षक मतदानाचा हक्क बजावतात हे रात्री स्पष्ट होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने सर्वांची उत्सुकता आता ताणला जाणार आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या २७ उमेदवारांचे भवितव्य ३५ हजार मतदार ठरविणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास ९०० अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून, विभागातील पाचही जिल्ह्यात ७७ मतदानकेंद्र आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-१९ च्या सुरक्षात्मक तथा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित मतदाराला दुपारी ४ ते ५ या वेळेत मतदान करण्याची मुभा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT