file photo 
विदर्भ

सापळा लावला रानडुकरासाठी अकडले मात्र बिबट...अन्‌ वाघीणही आढळली...

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर/साखरी : सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या व्याहाड खुर्द उपक्षेत्रातील शिर्शी बिटात जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 10) सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली; तर ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सीतारामपेठ येथे मृतावस्थेत वाघीण आढळून आली.

सध्या शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या परिसरात रानडुकरांनी हैदोस मांडला आहे. रानडुक्कर उभे पीक उद्‌ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रानडुकरांची शिकार करणे सुरू केले आहे.

शिर्सी परिसरात सापळा लावला

या शिकारीसाठी जंगलाजवळील शेतात जाळे लावण्यात येत आहेत. शिर्शी परिसरात रानडुकराला पकडण्यासाठी काही जणांनी जाळे लावले होते. मात्र रानडुकरासाठी लावलेल्या जाळ्यात साडेतीन वर्षीय बिबट अडकला. त्याचा दुपारी अकरा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाली.

प्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन

सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी जी. व्ही. धाडे, व्याहाड खुर्दचे क्षेत्रसहाय्यक डब्ल्यू. एन. बुराडे, वनसहाय्यक चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली. बिबट्याचे शवविच्छेदन करून पशुवैद्यकीय अधिकारी व वन्यप्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.


वाघीण आढळली मृत्यावस्थेत

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली रेंजमध्ये येणाऱ्या सीताराम पेठ या बिटात पूर्णवाढ झालेली वाघीण बुधवारी (ता. 10) मृतावस्थेत दिसून आली. सीतारामपेठ आणि कोंडेगाव रस्त्यालगत वाघीण मृतावस्थेत पडून होती. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर वाघिणीच्या मृत्यूचे कारण कळू शकणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT