carona.j 
विदर्भ

कोरोनाच्या उद्रेकातही वर्धा जिल्हा कसा राहिला ग्रीन झोनमध्ये

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कोरोना संसर्गाच्या या दोन महिन्याच्या काळात वर्धा ग्रीन झोनमध्ये राहिला. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे वर्ध्यात कोरोनाचे रुग्ण आढळले. राज्यातील प्रत्येक जिल्हा या आजाराच्या रुग्णांनी ग्रासला असताना वर्धा जिल्हा या विषाणूपासून मुक्‍त राहिल्याने वर्धा मॉडेलची चर्चा आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा राज्यात लागू झाला आणि जिल्ह्याची संपूर्ण सूत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती आली. स्थानिक स्तरावर उपजिल्हाधिकारी यांना वर्ध्यातील निर्णय घेण्याचे अधिकार आले. पालिका प्रशासन कंबर कसून कामाला लागले. सर्व पदाधिकारी, कर्मचारी संपूर्ण वर्धा शहरात पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र कायदा, सुव्यवस्थेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी झटू लागले. परंतु, केवळ संचारबंदी किंवा लॉकडाउन यामुळे कोरोनावर विजय मिळविता येणार नाही. कोरोनाला वर्ध्याच्या हद्दीबाहेर रोखायचे असेल तर काहीतरी वेगळ्या उपाययोजना करायला हव्या असे मत नगराध्यक्ष अतुल तराळे यांचे होते.
त्यांच्या सांगण्यानुसार एक टीम कामाला लागली. सेवाग्राम रुग्णालयाचे प्रमुख श्री. गर्ग यांच्याशी सविस्तर चर्चा करून एक आराखडा तयार करण्यात आला. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानासुद्धा अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने शहरात दाखल होत असल्याचे लक्षात आले. वर्धा जिल्ह्याला लागून असलेले सर्व जिल्हे रेड झोन असल्याने येणाऱ्यांना 14 दिवस क्‍वारंटाइन करण्याकडे विशेष लक्ष देणे सुरू झाले. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या देखरेखीखाली नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या नेतृत्वाखाली सेवाग्राम रुग्णालयाचे कम्युनिटी मेडिसीनचे प्रमुख डॉ. बावलेकर, डॉ. सुबोधशरण गुप्त, डॉ. अनुज मुंधडा, डॉ. माधुरी बोरकर, वर्धा पालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, आरोग्य सभापती सुरेश आहुजा अशा एकूण आठ जणांची समिती बनवण्यात आली.

शहरातील पाच झोनमध्ये 30 जणांची चमू
या अभियानात संपूर्ण शहराचे पाच झोन पाडण्यात आले. प्रत्येक झोनमध्ये एरिया नुसार नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले. प्रत्येक नोडल ऑफिसर सोबत अंगणवाडी, आशा सेविकेला नियुक्त केले. प्रत्येक झोनमध्ये किमान 30 जणांची टीम स्थापन झाली. हे 30 जण एका व्हॉट्‌सऍप गृपमधे जोडले गेले. घराघरांत जनजागृती आणि माहिती गोळा करणे सुरू झाले. होमक्‍वारंटाइन असलेल्यांना घरपोच शिधा-सामग्री पोहोचविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. जेणेकरून संसर्ग टाळता येईल. या पद्धतीने कोरोना विषाणू संसर्गाची चेन तोडून वर्धा शहर कोरोना मुक्त ठेवण्यात या टीमने आपले मोलाचे योगदान दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT