coocking oil 
विदर्भ

भाज्यांची चव होतेय बेचव, स्वयंपाकघरातील खाद्यतेलाचा भडका

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि . वर्धा) : प्रत्येकाचे स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलांच्या दराचा सध्या भडका उडाला आहे. यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मागील 45 दिवसांत तब्बल 30 टक्‍क्‍यांनी हे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंडोनेशियातील दुष्काळामुळे पामतेलाचे उत्पादन घटले आहे. तर, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील दुष्काळामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झाल्याने हे संकट देशवासियांसमोर उभे ठाकले आहे.

सर्वाधिक मागणी असलेले शेंगदाणा तेल आता 140 रुपये प्रतिकिलो, गोरगरिबांची पसंती असलेले पामतेल 95 रुपयांवर पोचले आहे. तर करडी तेल 180 रुपयांवर गेले आहे. सूर्यफुल तेल 108 रुपयांवर आहे. मध्यमवर्गीयांना आधार ठरत असलेले सोयाबीन तेलही 103 रुपयांवर गेले आहे. दिवाळीला या सर्व तेलांच्या प्रतिकिलो किमती साधारण 30 रुपयांनी स्वस्त होत्या. पामतेल 60 रुपये प्रतिकिलोवरून ते आता 95 रुपयांवर गेले आहे, असाच प्रकार सोयाबीन तेलाचाही झाला आहे.

भारतात इंडोनेशियासह मलेशियातून पामतेलाची आयात होते. इंडोनेशियात दुष्काळामुळे पामतेलाचे उत्पादन घटले आहे. त्यातच जैव इंधनात पामतेलाचा वापर 35 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याची सक्ती तेथील सरकारने केल्याने आगामी काही महिन्यात पामतेलाचे दर उच्चांक पातळी गाठतील. खाद्यतेलाचा भडका 45 दिवसांत 30 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. देशात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र, मध्य प्रदेशात होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने या दोन्ही राज्यांत सोयाबीन पीक हातचे गेल्याने देशात सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी पामतेल, सोयाबीन तेलांच्या दराचा आलेख अजूनही चढताच आहे. करडी, सूर्यफुलाचे उत्पादन आता फारसे घेतले जात नाही. त्यामुळे सर्वाधिक भर शेंगदाणा तेलावर असल्याने त्याचे दर 140 रुपयांवर पोहोचले आहेत.

हाटेलमधील खाद्यपदार्थ महागणार
खाद्यपदार्थ तेलाशिवाय तयार होऊच शकत नसल्याने आगामी काळात तयार खाद्यपदार्थ तसेच हॉटेलमधील पदार्थही महागणार हे निश्‍चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT