wardha traffic police action against 30 thousand vehicle  
विदर्भ

वाहनचालकांनो! नियमांचे उल्लंघन केल्यास भरावा लागणार दंड, तब्बल ४६ लाख वसूल

रूपेश खैरी

वर्धा : नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, अपघातांचे प्रमाण टळावे, यासाठी वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेचे नियम आहेत. परंतु, नागरिक या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत वाहने चालवित असल्याचे दिसून येते. पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात तब्बल 30 हजार 501 वाहनांवर कारवाई करून तब्बल 46 लाख 55 हजार 150 रूपयांचा दंड वसूल केला आहे. 

विना परवान्याशिवाय दुचाकी वाहने चालविणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, अनेक व्यक्‍तींकडे दुचाकी वाहन चालविण्याचा परवानासुद्धा नसतो. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट सक्‍तीचे केले आहे. प्रत्यक्षात कितीजण हेल्मेट घालतात, हे आपल्याला माहिती आहे. अल्पवयीन मुलांच्या हातातही दुचाकी वाहने दिसतात. त्यामुळे ते अपघाताला बळी पडतात. 

महामार्गावर वाहतूक शाखेतर्फे सूचनादर्शक फलकसुद्धा लावले आहेत. पण या नियमांचे कधी पालनच होत नाही. युवापिढी तर धूमस्टाइल बाईक चालवितात. वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेच्या वतीने अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उचलून कारवाई केली जाते. वाहतूक पोलिस शाखेने जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान हेल्मेट, सीटबेल्ट न लावणे, अतिवेगाने वाहन चलिवणे, मोबाईलवर बोलणे, जादा प्रवासी वाहतूक, सिग्नल जंपिंग, विना इन्शुरन्स, विना लायसन्स, अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन ठेवणे, म्युझिक हॉर्न, वाहतुकीस अडथळा, नो एन्ट्री, ट्रिपल सीट, इतर किरकोळ कारणे, मद्यप्राशन करून वाहने चालविणे, अशा तब्बल 30 हजार 501 जणांवर कारवाई करून 46 लाख 55 हजार 150 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

अनेकजण दुचाकी वाहने चालवितात. परिणामी, जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दररोज रस्ते अपघातात जिल्ह्यात एखादा तरी बळी जातो. प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Schemes 2025 : मोदी सरकारच्या ‘या’ योजनांनी गाजवलं 2025 वर्ष; तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच फायदा!

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Pune Fraud : "तुला 'एमबीबीएस'ला ऍडमिशन घेऊन देतो"; असं बोलून केली सव्वा कोटींची फसवणूक; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

वर्षाच्या शेवटी अमृता खानविलकरची चाहत्यांना खास भेट! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार

Pune News : नागरिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सिंहगड रस्त्यावर 'नऱ्हे पोलिस स्टेशनचे' दिमाखात उद्घाटन!

SCROLL FOR NEXT