saari virus in washim.jpg 
विदर्भ

बापरे! हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; मात्र, ओढावले नवे संकट

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्हा कोरोनामुक्त असताना जिल्ह्यात सारीचे पाच रुग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबाद येथे धुमाकुळ घालणाऱ्या या सारीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाल्याने जिल्हावासीयांसमोर नवीन संकट ठाकले आहे. असे असले तरी, या पाचपैकी चार रुग्ण उपचारानंतर सुखरूप घरी गेल्याने दिलासा मिळाला आहे. हा आजार कोरोनासारखाच लक्षणांचा समूह असून, त्याच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश अहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीव्र ताप, खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व सरळ-सरळ श्‍वसन संस्थेवर हल्ला करणारा लक्षणांचा समूह म्हणजेच सारी आजार होय. या सारीचे पाच रुग्ण वाशीम जिल्ह्यात आढळले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यांचीही ‘एच1- एन1’ आणि ‘कोविड19’ ची चाचणी करण्यात आली. पण, त्यांना ‘एच1- एन1’ अथवा ‘कोविड19’ चा संसर्ग आढळला नाही. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सारी’ सदृश्य रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात असून, त्याचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. त्या ‘सारी’ सदृश्य रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबादनंतर प्रथमच वाशीम जिल्ह्यात आढळलेल्या या ‘सारी’च्या रुग्णामुळे जिल्ह्याची आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे, एवढे मात्र निश्‍चित!

तिघांचे ‘स्वॅब’ नमुने प्रयोगशाळेत
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून आज (ता.29) तीन रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यामध्ये एक महिला ही कामरगाव येथील आहे. दुसरी महिला ही कोरोना बाधित क्षेत्रातून आलेली गर्भवती महिला आहे. तर तिसरा रुग्ण हा ‘सारी’ सदृश्य आजार असलेला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT