washim Industry, businesses need permission!  
विदर्भ

उद्योग, व्यवसायांसाठी घ्यावी लागणार परवानगी!

सकाळ वृत्तसेवा

वाशीम: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ता. तीन मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. मात्र, अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू  करण्यात आली असून, त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजनेत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार आवश्यक सेवांबाबतची दुकाने व आस्थापना सुरू  करण्यासाठी परवानगी देण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक कामे, आणि पांदण रस्ते यांची परवानगी प्रक्रिया संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदार यांच्या अखत्यारीत पूर्ण केली जाईल. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्‍यांकडून, तर एमआयडीसी क्षेत्राबाहेरील उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात येईल. जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतुकीचे परवानगी देण्याचे अधिकार पोलिस विभागाकडे देण्यात आले आहेत. फरसाण, कन्फेक्शनरी इत्यादी सेवांबाबत संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी परवानगी देतील.
 

‘कार्यक्षेत्रावरील मजुरांच्या आरोग्याची काळजी घ्या’
सद्य:स्थितीत कार्यक्षेत्रावर कार्यरत मजुरांमार्फतच कामे करण्यात यावीत. बाहेरून कोणतेही मजूर आणण्यास तसेच मजुरांना अथवा कुटुंबियांना कार्यक्षेत्र सोडून जाण्यास प्रतिबंध करावा. मजुरांना कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडता येणार नाही. मजुरांना क्षेत्रीय बांधकामाच्या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री किराणामाल, अन्नधान्य, भाजीपाला आदी बाबी उपलब्ध करण्याची व्यवस्था कंत्राटदाराने करावी. सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खात्री कंत्राटदार व कंत्राटदाराच्या पर्यवेक्षक अभियंत्यांनी करावी त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती क्षेत्रीय ठिकाणी अवलंबावी. कार्य क्षेत्रावरील मजूर, कुटुंबीय कर्मचारी, अभियंते यांच्यापैकी कुणालाही कोरोनासदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल व आरोग्य विभागाला कळविणे व स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार आहे.

मजुरांना मातृभाषेत माहिती द्या
कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सर्व मजुरांना व साईटवरील कर्मचार्‍यांना आरोग्यविषयक माहिती व मार्गदर्शक सूचना मातृभाषेत स्पष्टपणे अवगत कराव्यात. सद्यस्थितीत कार्यक्षेत्रावर कार्यरत मजुरांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी. तसेच कोणत्याही मजुरांची प्रकृती बिघडणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी. तसेच याकरिता वेगळी नोंदवही ठेवण्यात यावी. त्यामध्ये मजुरांची दैनंदिन आरोग्य स्थिती नमूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.

कोणती आस्थापना कधी सुरू राहिल...
कृषी उत्पन्न बाजार समित्या ........ सकाळी 10 ते सायं. 06
कृषी सेवा केंद्र ......................सकाळी 08 ते दुपारी 04
दूध संकलन केंद्र .....सकाळी 08 ते 10/ सायं. 06 ते 08
बँका, एटीएम .......................सकाळी 08 ते दुपारी 02
वैद्यकीय सेवा ..........................................24 तास
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ....सकाळी 08 ते दु. 12 पर्यंत

संचारबंदीचा भंग केल्यास कारवाई
लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संचारबंदी आदेशाचा भंग झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

बांधकामे, मोटारपंप दुरुस्तीकरीता....
सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा व इतर विभागांची बांधकामे यासाठी परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मोटरपंप, अवजड यंत्र, पाणीपुरवठा करणारे पंप, यंत्र व कृषिसाठी लागणारे पंप व बॅटरी यांची दुकाने सुरू करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT