water and food quality not good in paratwada of amravati 
विदर्भ

उपहरगृहामधील पाणी पिताय? जरा थांबा, होऊ शकतात गंभीर परिणाम

प्रकाश गुळसुंदरे

परतवाडा (जि. अमरावती) :  अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरासह तालुक्‍यात ग्रामीण भागात बहुतांश उपाहारगृहांमध्ये ग्राहकांना पिण्यासाठी दूषित पाणी दिली जात असल्याची ओरड आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. हीच स्थिती जिल्ह्यातील अनेक भागांत असल्याची माहिती आहे.

बहुतांश हॉटेलांमध्ये घाणीचे साम्राज्य असून ग्राहकांना पिण्यासाठी क्षारयुक्त तसेच अयोग्य पाणी दिले जात असल्याची ओरड आहे. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे बटाटे, कांदे, पालक, कोथिंबीर आदी साहित्यही कमी किंमतीचे निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याची चर्चा आहे, तर अनेक हॉटेलातील खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवत असल्याने त्यावर दिवसभर माशांचे थवे बसतात. हेच खाद्यपदार्थ ग्राहक खात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. असे असतानाही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अन्न व औषध प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता तरी वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय? अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.   

अनेक हॉटेलमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येत असून बहुतांश हॉटेलांत ग्राहकांना अयोग्य पाणी पिण्यासाठी दिले जाते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने सर्व हॉटेलांची तपासणी करून स्वच्छता ठेवण्यासोबत आरो अथवा शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना कराव्या, अन्यथा आंदोलन करू.
 -बंडू घोम, तालुकाध्यक्ष शिवसेना.

हा नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन नियमित तपासणी न करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच दोषी प्रतिष्ठान मालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
-विजय पोटे, तालुकाध्यक्ष मनसे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT