water bill not pay from 10 years in zp project in yavatmal  
विदर्भ

बापरे! दहा वर्षांपासूनची पाणीपट्टी थकीत, रक्कम बघून तुम्हालाही बसेल धक्का

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रकल्पांमधील आरक्षित पाणी वाटप झाले आहे. मात्र, या पाण्याची पाणीपट्टी अजूनही भरण्यात आली नाही. गेल्या दहा वर्षांपासून पाणीवाटपाची पाणीपट्टी थकीत असून, ही रक्कम तब्बल २१ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. दरम्यान, या थकीत पाणीपट्टीमुळे प्रशासनासमोरील अडचणींत वाढ झालेली आहे. 

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस होतो. असे असतानाही अनेक भागांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले जाते. मागणी व गरजेनुसार हे पाणी संबंधित गावाला दिले जाते. आरक्षित करून ठेवलेल्या पाण्याची पाणीपट्टी मागणी करणाऱ्या संस्थेने नियमित भरणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित संस्था पाणीपट्टी भरण्यास तयार राहत नाहीत. 

गेल्या दहा वर्षांपासून पैनगंगा, वाघाडी प्रकल्पाचे आरक्षित पाण्याची पाणीपट्टी संबंधित ग्रामपंचायतींनी भरलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पैनगंगा प्रकल्पाचे जवळपास २० कोटी, पाटबंधारे विभागाचे ९० लाख, असे जवळपास २१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. थकलेली पाणीपट्टी वसूल न केल्यामुळे संबंधित विभागाला प्रचंड अडचणींना तोड द्यावे लागत आहे. पाणीपट्टी भरण्याच्यादृष्टीने पंचायत समिती, ग्रामपंचायतींकडे प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला आहे. पाणीपट्टीची दमडीही संबंधित पंचायत समिती, ग्रामपंचायतीने भरली नाही. विशेष म्हणजे पाण्याच्या मागणीसाठी सातत्याने दबाव टाकला जातो. मात्र, पाणीपट्टी भरून घेण्याच्यादृष्टीने कुणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे संबंधित विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

तब्बल १९० गावांसाठी पाणी राखीव - 

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पांतील ४२.१० दलघमी पाणी गेल्या ऑक्‍टोबर महिन्यातच आरक्षित करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण १९० गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. त्यात ऊर्ध्व पैनगंगा, इसापूर धरणातील १५ दलघमी पाणी ४४ गावांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. वाघाडी, सायखेडा, नवरगाव, चिरकुटा, अडाण, वाई चंडदीका आदी प्रकल्पांतील राखीव पाण्यावर गावाची तहान भागविली जाणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT