Water scarcity is no more in this Grampanchayat  
विदर्भ

पाणीटंचाईचे संकट होणार दूर, ग्रामपंचायतीने कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती :  एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. आता ग्रामपंचायतीला 15 लाखांपर्यंतच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 15 लाखांवरील कामांचे इ-टेंडरिंग काढले जाणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लॉकडाऊनच्या काळातही जवळपास 450 गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याकारणाने पाणीटंचाईच्या उपाययोजना ऑनलाईन सोडविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर 15 लाखांपर्यंत योजनेची कामे घेण्यास जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी मान्यता दिली आहे. त्यावरील कामांचे इ-टेंडरिंग केले जाईल. सद्यस्थितीत 75 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून दोन गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे याच आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व गटविकास अधिकारी, शाखा अभियंता यांच्याशी व्हीसीव्दारे संपर्क साधून टंचाईचा आढावा घेण्यात आला.

350 गावांचे सर्वेक्षण

लॉकडाऊनच्या काळात जवळपास 350 गावांचे सर्वेक्षण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले असून आवश्‍यक तेथे उपाययोजना करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. यंदा टंचाई असली तरी ती गंभीर राहणार नाही, असे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अशा आहेत उपाययोजना

नळयोजनांची विशेष दुरुस्ती ः 66, तात्पुरती पूरक नळयोजना : 15, टॅंकरची स्थिती : 2, विहीर अधिग्रहण : 73, नवीन विंधन विहीर : 172.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT