weapon found in men house in Amravati  
विदर्भ

बाप रे बाप! युवकाच्या घरात सापडल्या तब्बल २१ तलवारी; समोर आलं धक्कादायक सत्य 

संतोष ताकपिरे

अमरावती ः गाडगेनगर पोलिसांनी चार सराईतांच्या घरांमधून 21 तलवारींसह एक पिस्तूल जप्त केली. चौघांनाही याप्रकरणी अटक केली.

जयसियारामनगर येथील अक्षय इंगळे यांच्या घरात तलवारी असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. तलवारीसह पिस्तूल आढळून आली. अक्षय (वय 20) याला अटक केली. 

ऑनलाइन ऑर्डर करून बोलविलेल्या तलवारी काहींना विकल्या होत्या, त्यातून समीर सुनील निकोसे, गोलू ऊर्फ मयूर दीपक चढार (वय 20), देवेंद्र ऊर्फ विक्की संजय बागडे (वय 27, रा. बेलपुरा) यांच्याकडून विविध आकाराच्या 18 तलवारी जप्त केल्या. 

याप्रकरणातील सूरज काशिनाथ यादव (वय 27, रा. शोभानगर) हा अद्याप फरार आहे. त्याच्याही घरामधून एक तलवार झडती घेत असताना सापडली. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले, शेखर गेडाम, सुभाष पाटील, रोशन वऱ्हाडे, उमेश भोपते, जयसेन वानखडे, आधीचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते. 21 तलवारी आणि एक पिस्तूल, अशी 51 हजारांची सामग्री जप्त करण्यात आली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

X Outage : जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ठप्प! लाखो युजर्सना फटका

'Virat Kohli भारतासाठी अजून ५-६ वर्षे खेळू शकतो', दिग्गज खेळाडूचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Pune Crime : धामणे तिहेरी हत्याकांड; मावळ हादरवणाऱ्या दरोड्यातील १० नराधमांना जन्मठेप!

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

SCROLL FOR NEXT